शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

NCB Sameer Wankhede : मला समन देण्यात आलेलं नाही, करण्यात आलेल्या आरोपांत तथ्य नाही - समीर वानखेडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 09:06 IST

NCB मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी दिल्लीत पोहोचल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. 

ठळक मुद्देवानखेडे यांनी २५ कोटी रूपयांच्या डीलच्या प्रकरणाचं खंडन करत हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं.

NCB Sameer Wankhede : आर्यन खान ड्रग्स प्रकरणी (Aryan Khan Drug Case) तपास करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede NCB) हे सोमवारी दिल्लीत दाखल झाले. आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. किरण गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. २५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं आणि ऐकल्याचं साईल यांचा दावा आहे. या आरोपांमुळे समीर वानखेडे यांची चौकशी केली जाणार आहे. दिल्लीला पोहोचल्यानंतर वानखेडे यांनी आपल्याला समन बजावण्यात आला नसल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं.

माध्यमांशी बोलताना वानखेडे यांनी २५ कोटी रूपयांच्या डीलच्या प्रकरणाचं खंडन करत हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं. तसंच आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातील त्याचं आपण उत्तर देऊ, असंही  ते म्हणाले. "मला समन देण्यात आलेलं नाही. मी या ठिकाणी एका वेगळ्या कामासाठी आलो आहे. माझ्या विरोधात करण्यात आलेले आरोप निराधार आहेत," असं वानखेडे यांनी स्पष्ट केलं.  अंतर्गत चौकशीया प्रकरणात फरार असलेल्या किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यानं पुढाकार घेत एनसीबीवर खळबळजनक आरोप केले आहेत. क्रूझ पार्टीवरील कारवाईवेळी आपण किरण गोसावीसोबत उपस्थित होतो आणि प्रकरणाचा साक्षीदार म्हणून माझ्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे एनसीबीची आता मोठी कोंडी झाली आहे. साईल यानं वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता वानखेडेंची खाते अंतर्गत चौकशी केली जाणार आहे. वानखेडेंची चौकशी करण्यात येणार असून त्याची जबाबदारी ज्ञानेश्वर सिंग यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय वानखेडेंवर आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल याचीदेखील चौकशी केली जाणार आहे.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोAryan Khanआर्यन खान