शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

NCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा कोरोना पॉझिटिव्ह; दीपिकाची केली होती चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 09:16 IST

NCB Deputy Director KPS Malhotra :अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार एनसीबीच्या रडारवर आहेत.

नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये ड्रग सिंडिकेटच्या सध्या सुरू असलेल्या चौकशीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे(एनसीबी) उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांना ​​कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर केपीएस मल्होत्रा ​​मुंबईहून दिल्लीला परतले आहेत.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार एनसीबीच्या रडारवर आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. एनसीबी एसआयटी टीमने दीपिका पादुकोणची बराच वेळ चौकशी केली होती. या टीमचे नेतृत्व केपीएस मल्होत्रा ​​करीत आहेत.

दीपिका पादुकोण हिची २६ सप्टेंबरला जवळपास साडे-पाच तास चौकशी करण्यात आली. यावेळी तिला सुशांतसिंह राजपूत किंवा रियाशी संबंधित कोणताही प्रश्न चौकशीत विचारला गेला नाही. एनसीबीचे संपूर्ण लक्ष दीपिकाच्या करिश्माच्या चॅटवर होते, ज्यात ती ड्रग्जबद्दल बोलत होती. तसेच, दीपिकानेही त्या चॅट संदर्भात एक मोठा कबुलीजबाब दिला आहे. ज्या चॅटमध्ये ड्रग्सविषयी बोलले जात होते. त्याचाच तो एक भाग आहे, असे दीपिकाने कबूल केल्याचे म्हटले जाते.

एनसीबीची टीम ज्यावेळी दीपिकाची चौकशी करत होती. त्यावेळी दीपिकाला तीनवेळा अश्रू अनावर झाले. त्यानंतर एनसीबी अधिका्यांनी तिला इमोशनल कार्डे न खेळण्याचा सल्ला दिला होता. तसेच, जर ती सर्व काही सत्य सांगत असेल तर तिच्यासाठी ते अधिक चांगले राहील, असे दीपिकाला सांगण्यात आले होते.

सुशांतची हत्या नव्हे आत्महत्या, एम्सचा अहवालबॉलिवूडचा अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली आहे, असा निष्कर्ष एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी काढला आहे. त्यामुळे त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले का, यादृष्टीने सीबीआय तपास करणार असल्याचे सांगण्यात आले. सुशांतने आत्महत्याच केली अशा निष्कर्षाप्रत मुंबई पोलीस आले होते. पण मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचे सांगून सुशांतचे कुटुंबीय आणि बिहार पोलिसांनी तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी केली होती. सुशांतसिंह याचा शवचिकित्सा अहवाल व अन्य बाबींची फेरतपासणी डॉ. गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने केली. सुशांतसिंह याच्या व्हिसेराचा २० टक्के नमुना फेरतपासणीसाठी उपलब्ध असल्याने, त्याची तपासणी करून एम्सच्या डॉक्टरांच्या पथकाने हा निष्कर्ष काढला आहे. सुशांतसिंह प्रकरणी फोरेन्सिक तज्ज्ञांनी एक लॅपटॉप, दोन हार्डडिस्क, कॅनन कॅमेरा व दोन मोबाइल फोनचीही बारकाईने तपासणी केली आहे. 

टॅग्स :Deepika Padukoneदीपिका पादुकोणNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो