शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अप्पारावच्या एन्काउंटरने घाबरलेल्या नक्षलवाद्यांनी कट रचला; जवानांनी धोकादायक प्लॅन उधळून लावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 21:02 IST

नक्षलवाद्यांनी बिजापूरमध्ये एक मोठा कट रचला होता. जवानांनी त्यांचा प्लॅन हाणून पाडला आहे.

काही दिवसापूर्वी छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये जवानांनी नक्षलवाद्याविरोधात मोठी कारवा केली. या कारवाईमध्ये सुरक्षा दलांनी अनेक नक्षलवाद्यांना ठार मारले, यात एका कट्टर नक्षलवादीचाही समावेश होता. या नक्षलवादीची ओळख जयराम उर्फ ​​अप्पाराव अशी झाली आहे. या नक्षलवाद्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. जयराम हा नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. त्याच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांनी बिजापूरमध्ये एक मोठा कट रचला होता, हा कट आता जवानांनी उधळून लावला आहे.

१६ लाख रोजगार, १५ लाख कोटींची गुंतवणूक; दावोस दौऱ्याने महाराष्ट्राला काय काय दिलं?

जवानांच्या सतर्कतेमुळे बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळून लावण्यात आला. बासगुडा आणि अवपल्ली रस्त्यावर खाणकाम करण्यासाठी गेलेल्या पथकाला वेळीच बॉम्ब सापडला. मायनिंग पथकाने बॉम्ब घटनास्थळीच निकामी करून मोठी दुर्घटना टळली. केंद्रीय राखीव पोलीस दलाची १६८ वी BDS टीम आज नियमित शोध मोहिमेवर गेली होती.

बासगुडा आणि अवपल्ली रस्त्यावर तिमापूरजवळ एक दुर्गा मंदिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिराजवळील पुलाखाली नक्षलवाद्यांनी बॉम्ब ठेवला होता. बीडीएस टीम पुलावर पोहोचताच त्यांना मेटल डिटेक्टरमध्ये ५० किलो आयईडीचा सिग्नल मिळाला. बीडीएस टीमला बॉम्बची माहिती तात्काळ देण्यात आली आणि ते घटनास्थळीच निकामी करण्यात आले.  बॉम्ब निकामी करण्यात आला तेव्हा त्याच्या स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटर अंतरावर ऐकू आला.

नक्षलवाद्यांनी हा बॉम्ब कल्व्हर्टखाली काँक्रीट आणि दगडांमध्ये लपवून ठेवला होता. जवानांनी पहिल्यांदा तेथून बॉम्ब काढण्याचा प्रयत्न केला, पण बॉम्ब खूप खोलवर पेरलेला होता. तिथून बॉम्ब काढणे प्राणघातक ठरू शकले असते. म्हणून, बीडीएस टीमने आयईडी जागीच नष्ट करणे अधिक चांगले आणि सुरक्षित मानले. यानुसार त्यांनी तिथेच नष्ट केला. 

जवानांच्या सतर्कतेमुळे मोठा प्लॅन उधळला

शोध मोहिमेवर गेलेल्या सतर्क जवानांमुळे आज मोठी दुर्घटना टळली. नक्षलवाद्यांचा एक मोठा कट उधळून लावण्यात आला. ज्या ठिकाणी बॉम्ब निकामी करण्यात आला होता ती जागा भरण्यात आली आहे आणि रस्ता वाहतुकीसाठी योग्य करण्यात आला आहे. मोठ्या वाहनांना आणि जवानांना नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी कल्व्हर्टखाली आयईडी पेरल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांच्या नापाक योजना उधळून लावण्यात आल्या.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादी