शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी नक्षलवादी हल्ला, IED स्फोटात एक जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 12:37 IST

नारायणपूरच्या अमदई खाणीत नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी नक्षलवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला. तर अन्य एक जण जखमी झाला आहे. राजधानीत आयोजित एका कार्यक्रमात विष्णुदेव साई मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असतानाच नारायणपूरमध्ये हा हल्ला झाला.

नारायणपूरच्या अमदई खाणीत नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी येथे आयईडी पेरली होती. CAF ९व्या बीएन बटालियनचे सैनिक त्याच्या ताब्यात आले. या हल्ल्यात सीएएफ कॉन्स्टेबल कमलेश साहू शहीद झाले. तर हवालदार विनय कुमार साहू जखमी झाले आहेत. एसपी पुष्कर शर्मा यांनी हल्ल्याला दुजोरा दिला आहे.

यापूर्वी सोमवारी सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला होता. यामध्ये दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. किस्टाराम पोलीस स्टेशन परिसरात हा स्फोट झाला. येथे सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक रस्ते बांधणीच्या कामाला सुरक्षा देण्यासाठी गस्त घालत होते. त्यानंतर हा स्फोट झाला.

छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशीही धमतरी येथे नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला होता. गस्तीवर असलेल्या सीआरपीएफ आणि डीआरजी पथकांवर नक्षलवाद्यांनी एकापाठोपाठ एक आयईडी स्फोट घडवून आणले होते. मात्र, यावेळी दुचाकीवर बसलेले २ सीआरपीएफ जवान थोडक्यात बचावले. त्याच दिवशी छत्तीसगडमधील बिंद्रनवागडमध्ये निवडणूक ड्युटीमध्ये गुंतलेल्या टीमवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आयटीबीपीचा एक जवान शहीद झाला होता. दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर मतदान पथक परतत असताना हा आयईडी स्फोट झाला.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादी