ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. ११ - छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा पथकावर केलेल्या हल्ल्यात सात जवान शहीद तर १० जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. सुकमा जिल्ह्यातील पिडमेलपारा येथे विशेष तपास पथकाचे ( एसटीएफ) जवान नक्षवाद्यांना शोधण्यासाठी मोहिम राबवत असतानाच मोठ्या संख्येन आलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात ७ जवान शहीद आणि १० गंभीर जखमी झाले. नक्षलवादी व जवानांदरम्यान अद्याप चकमक सुरूच आहे.