शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गुगलऐवजी आता नाविकची जीपीएसप्रणाली

By admin | Updated: May 29, 2017 01:16 IST

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला कोणतीही माहिती हवी असली की, आपण लगेच गुगलवर जातो. अगदी प्रवास करतानाही रस्ते शोधताना

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला कोणतीही माहिती हवी असली की, आपण लगेच गुगलवर जातो. अगदी प्रवास करतानाही रस्ते शोधताना गुगल सर्च इंजिन सहजपणे देश-परदेशात वापरले जाते. परदेशामध्ये तर प्रवास करताना गुगल मॅप्स सुरू करण्याची पद्धतच आहे; पण आता भारतात गुगलऐवजी नवीन जीपीएस अ‍ॅप येत आहे आणि तेही संपूर्ण भारतीय. ठं५कउ (नाविक) असे या अ‍ॅपचे नाव असून, त्याच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. त्या पूर्ण झाल्या की, हे जीपीएस सर्वांसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती अहमदाबाद स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरचे संचालक तपन मिश्रा यांनी दिली आहे. या जीपीएस प्रणालीचे नाविक हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचविले आहे. नाविक म्हणजे नौका चालविणारा, म्हणजेच वाटाड्या वा सारथी. ही जीपीएसप्रणाली सात उपग्रहांच्या आधारे चालणार असल्याने ती केवळ भारतापुरती, पण अतिशय अचूक असेल, असे मिश्रा यांचे म्हणणे आहे. हिंदी महासागरासह देशाच्या आसपासच्या भागाची माहितीही ‘नाविक’मध्ये कळू शकेल. जगातील काही देशांमध्येच स्वत:ची जीपीएसप्रणाली आहे. अशा देशांच्या यादीत आता भारताचाही समावेश होणार आहे. अमेरिकेची जीपीएसप्रणाली २४ उपग्रहांना जोडण्यात आली आहे. अर्थात अमेरिका हा देशही अतिशय अवाढव्य आहे, तसेच तेथील जीपीएसप्रणालीही जगभरात अचूक म्हणून ओळखली जाते. भारताची नाविकप्रणालीही तशीच असेल, असे मिश्रा यांचे म्हणणे आहे.