शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

नाट्य परिषदेने मध्यवर्तीच्या उपाध्यक्षांना केले पायउतार (१)

By admin | Updated: September 14, 2015 00:39 IST

- नागपूरच्या प्रमोद भुसारींचे सदस्यत्व काढले : नागपूर नाट्य परिषदेची संतप्त प्रतिक्रिया

- नागपूरच्या प्रमोद भुसारींचे सदस्यत्व काढले : नागपूर नाट्य परिषदेची संतप्त प्रतिक्रिया
नागपूर : गेले काही महिने नागपूर नाट्य परिषदेत अनेक वाद निर्माण झाले. हे वाद टोकाला पोहोचले आणि नाट्य परिषदेचे दोन गट पडले. याच्या तक्रारी वारंवार मध्यवर्ती शाखेकडे काही कलावंतांनी केल्या. धर्मादाय आयुक्तांकडे नागपूरच्या प्रमोद भुसारी यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून नागपूर शाखेचा वाद, भांडणे संपत नाही आणि न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत भुसारींनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने कार्यकारिणीत चर्चेला येत गेली. भुसारी नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीच्या कार्यकारिणीबाबत विरोधात बोलतात, सहकार्य करीत नाहीत, असाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. अखेर नाट्य परिषदेच्या आजच्या मुंबई येथील मध्यवर्ती शाखेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत प्रमोद भुसारी यांना उपाध्यक्ष पदावरून पायउतार करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
नियामक मंडळाच्या बैठकीत भुसारी यांचा विषय सातत्याने विषय पत्रिकेवर येत होता. त्यावर चर्चा करण्यात वेळ जात होता. भुसारींनी न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत पदाचा अस्थायी राजीनामा द्यावा, असे त्यांना सुचविण्यात आले होते. पण भुसारी यांनी राजीनामा देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे नागपूर नाट्य परिषदेचे वाद थांबवा आणि नाराज झालेल्या सदस्यांशी समेट घडवा, अशीही सूचना त्यांना करण्यात आली. पण भुसारींना नागपूर नाट्य परिषदेचे वाद संपविता आले नाहीत आणि नाराज सदस्यांशीही समेट घडवून आणण्यात अपयश आल्याने सातत्याने नागपूर नाट्य परिषदेच्या संदर्भातील तक्रारींचा पाऊस मध्यवर्तीकडे येत होता. परिषदेला यामुळे नाट्य विषयक उपक्रम राबविण्यापेक्षा अंतर्गत भांडणे सोडविण्याचेच उपक्रम करावे लागत होते. नागपूर नाट्य परिषदेचे वाद सोडविण्यासाठी अध्यक्ष मोहन जोशी आणि दीपक करंजीकर नागपूरला येऊन गेले. पण भुसारींच्या विरोधातील सदस्यांशी चर्चा करून काहीच निर्णय होऊ शकला नाही. यात तक्रारी अधिक वाढल्या. भुसारी कार्यकारिणीत उपाध्यक्ष असल्याने बैठकांमध्ये इतर निर्णयांपेक्षा नागपूर नाट्य परिषदेच्या तक्रारींचीच चर्चा जास्त होत होती. त्यात भुसारी यांनी मध्यवर्तीच्या सदस्यांबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्याची लिखित नोंदही असल्याचे मध्यवर्तीच्या सूत्रांकडून कळले आहे. भुसारी नाट्य परिषदेच्या विरोधात कारवाई करीत असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांना उपाध्यक्ष पदावरून पायउतार करण्याचा निर्णय नियामक मंडळाच्या बैठकीत एकमताने रविवारी मुंबईत घेण्यात आला. या बैठकीला भुसारी मात्र अनुपस्थित होते.