शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केदारनाथ, चामोलीत नैसर्गिक दुर्घटना टळतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 04:56 IST

आयआयटी वैज्ञानिकांनी सुचवला उपाय

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील केदारनाथ आणि चामोलीत भविष्यात नैसर्गिक दुर्घटना होऊ नयेत यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी तंत्र सांगितले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (कानपूर) वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, जर हिमालयातील हिमनदी जलग्रहण क्षेत्रांची उपग्रहांद्वारे रियल टाइम देखरेख केली गेल्यास धौलीगंगा आणि केदारनाथमध्ये घडलेल्या दुर्घटनांच्या आधी लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जाऊ शकते. उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या रियल टाइम माहितीमुळे अशा दुर्घटनांची माहिती आधीच समजेल.या वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार हिमालय क्षेत्रांत हिमनद्यांत बनलेली सरोवरे फुटल्यास जीवितहानी टाळण्यासाठी परिणामकारक धोरण असले पाहिजे. या वैज्ञानिकांत डॉ. तरुण शुक्ल आणि प्रोफेसर इंद्र शेखर सेन यांचा समावेश आहे. या अभ्यासात त्यांना भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने मदत केली. हा अभ्यास आंतरराष्ट्रीय मासिक ‘सायन्स’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

तिसरा ध्रुव nजलवायु परिवर्तनाच्या कारणामुळे तापमान आणि जास्त पावसाच्या घटना वेगाने वाढत आहेत. हिमालयाला जगाचा तिसरा ध्रुवही म्हटले जाते. येथे जगाचा सर्वात मोठा बर्फाळ भाग आहे. nहिमालयातील हिमनद्या तुलनात्मक रूपात वेगाने वितळत आहेत. यामुळे हिमालयात अनेक ठिकाणी सरोवर निर्माण होत आहेत. जर हिमनद्या वितळल्यामुळे सरोवरांच्या वर जास्त पाऊस होत असेल किंवा त्यांच्यावर कोणता मोठा दगड किंवा बर्फाचा तुकडा कोसळत असेल तर त्यामुळे केदारनाथ किंवा चामोलीसारख्या दुर्घटना होतील. nहिमालय यावेळी नैसर्गिक संकटांचे केंद्र बनत आहे. यात धोकादायक घटना हिमनद्यांच्या माध्यमातून बनणारे सरोवर फुटल्यामुळे घडतात. 

टॅग्स :Kedarnathकेदारनाथ