शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाला थारा देणाऱ्या देशांचा विरोध व्हावा; पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानवर वार

By कुणाल गवाणकर | Updated: November 17, 2020 18:07 IST

ब्रिक्स देशांच्या परिषदेत पंतप्रधान मोदींचं भाषण; पाकिस्तानवर अप्रत्यक्ष हल्ला

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रिक्स देशांच्या शिखर संमेलनात दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत पाकिस्तानवर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडलं. दहशतवादाला पोसणाऱ्या, दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या देशांचा विरोध व्हायला हवा, असं मोदी म्हणाले. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत बदलांची गरज असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.'जागतिक कारभाराच्या कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होऊ लागली आहेत. बदलत्या काळासोबत यामध्ये बदल न झाल्यानं प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. कारण संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची रचना ७५ वर्षे जुनी आहे. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. परिषदेची रचना ७५ वर्षांपूर्वीच्या मानसिकता आणि वास्तविकतेवर बेतलेली आहे. यामध्ये बदल होण्याची नितांत गरज असल्याचं भारताला वाटतं. यामध्ये ब्रिक्स संघटनेतील देश सहकार्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे,' असं मोदी म्हणाले.संयुक्त राष्ट्रासोबतच अनेक आंतरराष्ट्रीय संघटनादेखील वर्तमानातल्या वास्तवानुसार काम करत नसल्याचं मतही मोदींनी व्यक्त केलं. 'जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक आरोग्य संघटनांमध्येही बदलांची गरज आहे,' असं प्रतिपादन मोदींनी केलं. यावेळी त्यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. 'आज संपूर्ण जग दहशतवादाचा सामना करत आहे. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या आणि सहाय्य करणाऱ्या देशांना दोषी ठरवणंदेखील गरजेचं असून एकत्रितपणे या समस्येचा सामना करायला हवा,' असं मोदी म्हणाले.पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या कार्याचं कौतुक केलं. 'पुतीन यांच्या नेतृत्त्वाखालच्या रशियानं ब्रिक्स संघटनेच्या दहशतवादाविरोधातील रणनीतीला अंतिम स्वरुप दिल्याचा आनंद आहे. ब्रिक्स संघटनेचं हे मोठं यश आहे. भारत आपल्या अध्यक्षतेखाली हे काम आणखी जोमानं पुढे नेईल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी