शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या ८० कुटूंबांना जगण्याच्या लढाईत बळ देणार सुप्रियाताई साधणार दुष्काळग्रस्ताशी संवाद : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची माहिती

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

नांदेड : मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवा पत्नी आणि मुलांना जीवनात उभे करण्याासाठी खा़सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्विनी सामाजिक अभियानाने काम सुरू केले असून मराठवाड्यातील अत्यंत गरजू आणि कमी वय असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या ८० विधवा पत्नींना दत्तक घेतले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी पत्रपरिषदेत दिली़

नांदेड : मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवा पत्नी आणि मुलांना जीवनात उभे करण्याासाठी खा़सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्विनी सामाजिक अभियानाने काम सुरू केले असून मराठवाड्यातील अत्यंत गरजू आणि कमी वय असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या ८० विधवा पत्नींना दत्तक घेतले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी पत्रपरिषदेत दिली़
नांदेड जिल्हा महिला आघाडीतील फेरबद्दल आणि नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडीकरीता त्या नांदेडात आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांमध्ये तरूण शेतकर्‍यांचे प्रमाण बरेच आहे़ अशा अनेक शेतकर्‍यांच्या पत्नीला सासर आणि माहेरचादेखील आधार नाही़ त्यांना जीवनात उभे करण्याकरीता कायमस्वरूपी व्यवसाय, नोकरी उपलब्ध व्हावी याकरीता यशस्वीनी अभियान प्रयत्न करणार असल्याचे वाघ यांनी सांगितले़ मराठवाड्यात ८० स्त्रीयांना त्यांच्या आवडीनूसार व्यवसाय प्रशिक्षण आणि शिक्षण दिले जाणार आहे़ तर त्यांच्या मुलांना शिक्षणाकरीता बारामती येथील शारदा प्रतिष्ठानमध्ये ठेवण्यात येणार आहे़ याठिकाणी राहणे, जेवन, शिक्षण सर्व सुविधा मोफत पुरविल्या जात आहेत़ तसेच काही स्त्रीयांच्या मागणीनूसार त्यांना दुग्धव्यवसायाकरीता गायी, शेळ्या दिल्या जाणार आहेत़ आगामी काळात खा़सुप्रियाताई सुळे या नांदेड जिल्हा दौरा करून दुष्काळग्रस्तांशी संवाद साधणार असून जिल्‘ाच्या समन्वयाची जबाबदारी कल्पना पाटील डोंगळीकर यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले़ दरम्यान, तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाविषयी बोलतांना चित्राताई वाघ म्हणाल्या, मंदिरात जायला महिला शिल्लक रहायला पाहीजे़ आज महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतो आहे, पाण्याकरीता वणवण फिरणार्‍या महिलांच्या समस्या वेगळ्याच आहेत़ पाणी प्रश्नाला प्राधान्य देवून ग्रामीण भागातील स्त्रीयांच्या प्रश्नासाठी लढावे लागणार आहे़ पुरोगामी महाराष्ट्रात आजही सामाजिक अधिकाराकरीता स्त्रीयांना लढावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़ मंदिर प्रवेशास विद्यमान मुख्यमंत्र्यांचा विरोध नाही तर त्यांनी स्त्रीयांना सन्मानाने मंदिरात सोडण्याची व्यवस्था करायला हवी होती़ गृहमंत्री पद त्यांच्याकडे असतांना मंदिर प्रवेश करतांना स्त्रीयांना धक्काबुक्की होती, ही बाब लाजीरवाणी आहे़
पत्रपरिषदेअगोदर झालेल्या बैठकीत चित्राताई वाघ यांच्या हस्ते प्रदेश चिटणीस कल्पना पाटील डोंगळीकर, नुतन शहर जिल्हाध्यक्षा कृष्णा मंगनाळे आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रांजली रावनगावकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले़ यावेळी बापुसाहेब गोरठेकर, डॉ़सुुनील कदम, शिला कदम, रामनारायण बंग, जीवन पाटील घोगरे, सविता कंठेवाड, गणेश तादलापूरकर, सारिका बच्चेवार, रितू कोलंबीकर आदी उपस्थित होते़