शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2016 00:03 IST

हॅलो १ साठी...

हॅलो १ साठी...
जळगाव- जागतिक मुद्रण दिनानिमित्त केसीई संस्थेच्या मल्टीमीडिया विभागातर्फे २४ रोजी सकाळी ९.३० वाजता मुद्रकांसाठी सेमीनार, मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी गुजरात, मध्य प्रदेशातील मुद्रकांत आमंत्रीत करण्यात आले आहे. उपस्थितीचे आवाहन आयोजक प्राचार्य उदय कुलकर्णी यांनी केले आहे.
चित्रपट गृहांना बिकट दिवस
जळगाव- मराठी चित्रपटांना कर माफी व निर्मात्यांना सवलती दिल्या जातात. परंतु चित्रपट गृहांना सवलती नसतात. ही बाब अयोग्य असल्याचे जिल्हा चित्रपट प्रदर्शक संघाचे महेंद्र लुंकड यांनी एका निवेदनात म्हटले आहे. एक पडदा चित्रपट गृह संघटनेतर्फे शासनाकडे विविध मागण्या केल्या. त्यात करमणूक कर माफ करा, सवलती द्या आदी मागण्या केल्या, पण त्यांची दखल घेतली नाही. आता व्यवसाय करणे तोट्याचे, अडचणीचे आहे. जिल्ह्यात ३० एक पडदा चित्रपट गृह बंद झाले झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
सफाई अभियान
जळगाव- संत निरंकारी मंडळातर्फे २३ रोजी सकाळी ७.३० वाजेपासून सफाई अभियान शहरात राबविले जाणार आहे. रेल्वे स्टेशन भागात ही मोहीम अधिक तीव्र असेल. तसेच मंडळाच्या शिरसोली रोडवरील नवनिर्मित भवन परिसर स्वच्छ केला जाईल. तसेच ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जाईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता संत निरंकारी भवन, शिरसोली रोड येथे सत्संग होईल, असे राजकुमार वाणी यांनी कळविले आहे.

वर्ल्ड सायन्स डे
जळगाव- वर्ल्ड सायन्स डेनिमित्त वर्धमान अकॅडमीतर्फे २८ रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. त्यात विद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर केले जातील, असे कळविण्यात आलेे आहे.

व्याख्यान
जळगाव- जिल्हा वकील संघातर्फे तणावमुक्त जीवन या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. डॉ.शालीग्राम भंडारी यांनी व्याख्यान दिले. जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी.अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. संघाचे अध्यक्ष ॲड.लक्ष्मण वाणी अध्यक्षस्थानी होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश पटनी, वकील संघाचे सचिव ॲड.गोविंद तिवारी, उपाध्यक्ष स्वाती निकम, सहसचिव रुपाली भोकरीकर, कोषाध्यक्ष राहुल झवर, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भरती मेळावा
जळगाव- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मेस हॉलमध्ये २५ रोजी आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती मेळावा घेण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता सुरुवात होईल. जिल्ह्यातील अनेक नामांकीत आस्थापनांशी संबंधीत अधिकारी उपस्थित राहतील, असे कळविण्यात आले आहे.