शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष दर्जा रद्द; तृणमूल, भाकपचाही दर्जा निवडणूक आयोगाने काढला

By ओमकार संकपाळ | Updated: April 11, 2023 04:59 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रमुख असलेल्या आम आदमी पक्षाला  निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.

नवी दिल्ली :

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रमुख असलेल्या आम आदमी पक्षाला  निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार अध्यक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अध्यक्ष असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) या तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आयोगाने काढून घेतला आहे. हा आदेश निवडणूक आयोगाने सोमवारी जारी केला.

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, आता देशात भाजप, काँग्रेस, माकप, बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी, आप या सहा पक्षांनाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे.

यांचा राज्य दर्जा रद्दराष्ट्रीय लोक दल (उत्तर प्रदेश), भारत राष्ट्र समिती (आंध्र प्रदेश), पीपल्स डेमोक्रॅटिक अलायन्स (मणिपूर) मध्ये, पट्टली मक्कल काटची (पुडुचेरी), रेव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (प. बंगाल), मिझोराम पीपल्स कॉन्फरन्स (मिझोराम).  

आप राष्ट्रीय का?दिल्ली, गोवा, पंजाब, गुजरात या चार राज्यांतील निवडणुकांत आप पक्षाने केलेल्या कामगिरीमुळे त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला.

राष्ट्रवादी नागालँडमध्ये ठरला राज्य पक्षnराष्ट्रवादी काँग्रेस व तृणमूल काँग्रेसला अनुक्रमे नागालँड व मेघालय या राज्यांत राज्य पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. या दोन राज्यांत काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षांनी केलेल्या कामगिरीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला. nलोक जनशक्ती पार्टी (रामविलास) या पक्षाला नागालँडमध्ये, व्हॉईस ऑफ पीपल्स पार्टीला मेघालयात तर टिपरा मोथा या पक्षाला त्रिपुरामध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. 

...हा चमत्कार नाहीआप हा अल्पावधीतच राष्ट्रीय पक्ष झाला हा चमत्कार नाही. देशातील कोट्यवधी लोकांमुळे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. जनतेच्या आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या आम्ही पूर्ण करू.- अरविंद केजरीवाल, आप पक्षाचे संयोजक 

भाकप हा जनमानसात रुजलेला पक्षपक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असणे हे तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे असते. मात्र भाकप हा पक्ष जनमानसात रुजलेला आहे. लोकशाही, सेक्युलॅरिझम, सोशॅलिझम यांना वाचविण्यासाठी आमचा लढा यापुढेही सुरूच राहील. - बिनाॅय विश्व, राष्ट्रीय सरचिटणीस, भाकप

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार