शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पक्षांना ६०% रक्कम मिळाली अज्ञात स्रोतांकडून! ८२ टक्के रक्कम निवडणूक रोख्यांतून; एडीआर अहवाल समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 13:19 IST

एकूण देणग्यांपैकी सुमारे ८२ टक्के रक्कम निवडणूक रोख्यांतून मिळाली होती, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संघटनेने अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली : २०२२-२३ या कालावधीत राष्ट्रीय पक्षांना मिळालेला तब्बल ५९.५७% निधी हा अज्ञात स्रोतांकडून मिळाला असून, यात निवडणूक रोख्यांचाही समावेश आहे. एकूण देणग्यांपैकी सुमारे ८२ टक्के रक्कम निवडणूक रोख्यांतून मिळाली होती, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संघटनेने अहवालात म्हटले आहे.

राष्ट्रीय पक्षांनी निवडणूक आयोगाला सादर केलेले आपले ताळेबंद अहवाल व देणग्यांंसंदर्भातील दस्तावेज यांचे एडीआरने विश्लेषण केले. त्यानंतर एडीआरने आपल्या निष्कर्षात म्हटले आहे की, या पक्षांना मिळालेल्या बहुतांश देणग्यांचे स्रोत अज्ञात आहेत. २०२२-२३ साली राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांपैकी १८३२.८८ कोटी रुपयांचे स्रोत अज्ञात आहेत. 

मिळाल्या ३ हजार कोटींच्या एकूण देणग्या२०२२-२३ या वर्षात राजकीय पक्षांना निवडणूक रोखे, कुपन विक्री आदी माध्यमांतून एकूण ३०७६.८८ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. २० हजार रुपयांपेक्षा कमी देणगी देणाऱ्यांची नावे उघड करण्याचे बंधन सध्या राजकीय पक्षांवर नाही. निवडणूक रोखे घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाने आता ती योजनाच रद्दबातल केली आहे.

अज्ञात स्रोतांतून निधी -अज्ञात स्रोतांतून १८३२ कोटी ५८.५७% ज्ञात स्त्रोतांकडून ८५० कोटी २७.४६% इतर स्त्रोतांतून ३९३ कोटी १२.७९% 

कोणत्या पक्षांना देणग्या मिळाल्या?८२.४२ टक्के म्हणजे १,५१० कोटी रुपयांची रक्कम निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पक्षांना मिळाली आहे. एडीआरने भाजप, काँग्रेस, माकप, बसप, आप, एनपीईपी या पक्षांचे ताळेबंद व देणग्यांबाबतचे दस्तऐवज यातील माहितीचे विश्लेषण केले.

१९ हजार कोटी अज्ञात स्त्रोतांकडून...- २००४-२००५ ते २०२२-२३ दरम्यान सर्व राष्ट्रीय पक्षांनी अज्ञात स्त्रोतांकडून १९,०८३ कोटी रुपये जमा केले आहेत. - २०२२-२३ दरम्यान भाजपने अज्ञान स्त्रोतांकडून १४०० कोटी रुपये देणगी मिळविली जी सर्व राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत ७६% अधिक आहे.- भाजपचे उत्पन्न इतर ५ राष्ट्रीय पक्षांच्या अज्ञात स्त्रोतांच्या तुलनेत ९३७ कोटींपेक्षा अधिक आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक