शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

नॅशनल मेडिकल कौन्सिल विधेयक लोकसभेत मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 07:17 IST

इन्स्पेक्टर राज संपणार; केंद्र सरकारचा दावा

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या जागी नॅशनल मेडिकल कमिशन स्थापन करण्याबाबतचे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. या अत्यंत महत्त्वाच्या बदलांमुळे वैद्यकीय शिक्षणक्षेत्रातील इन्स्पेक्टर राज संपणार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

हे विधेयक लोकसभेत २६० विरुद्ध ४८ मतांनी संमत झाले. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशपरीक्षेचा तसेच विदेशातून वैद्यकीय पदवीधर झालेल्यांसाठी होणाऱ्या स्क्रिनिंग टेस्टचा दर्जा या विधेयकातील तरतुदींनुसार मिळणार आहे. ही परीक्षा नॅशनल एक्झिट टेस्ट (नेक्स्ट) या नावाने ओळखली जाईल. वैद्यकीय शिक्षणात एकसूत्रता आणण्यासाठी नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक तयार करण्यात आले आहे.एक्झिट परीक्षा तसेच निवडलेल्या सदस्यांची जागी नामनियुक्त सदस्य नेमणे यासारख्या या विधेयकातील तरतुदींवर विरोधी पक्षांनी टीका केली. काँग्रेसचे मनीष तिवारी म्हणाले की, रोगापेक्षा इलाज भयंकर अशी या विधेयकाची अवस्था आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणाले की, नॅशनल मेडिकल कमिशनचे अनेक फायदे आहेत. देशात वैद्यकीय शिक्षणाच्या जागांमध्ये वाढ होणार असून या क्षेत्रातील भ्रष्टाचारही कमी होईल. याचा मोठा फायदा गरिबांना होणार आहे.प्रतिनिधित्व नाहीकाँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी म्हणाले की, नॅशनल मेडिकल कमिशनमध्ये राज्यांना पुरेशा प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. संघराज्य पद्धतीला विसंगत अशी या कमिशनची रचना आहे. द्रमुकचे नेते ए. राजा हे विधेयक गरिबांच्या विरोधातील, सामाजिक न्याय नाकारणारे, लोकशाहीविरोधी असल्याची टीका केली आहे. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयlok sabhaलोकसभा