शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

National Language: हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही? जाणून घ्या राष्ट्रभाषा-राजभाषा आणि मातृभाषेतील अंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 11:56 IST

National Language: भारतासारख्या विशाल आणि वैविध्यपूर्ण देशात अनेक भाषा आणि बोली लिहिल्या, वाचल्या आणि बोलल्या जातात. अशा परिस्थितीत राष्ट्रभाषेबाबत आपले संविधान काय सांगते, ते जाणून घेऊया.

National Language: सोशल मीडिया दररोज विविध गोष्टींवरुन वाद-प्रतिवाद केले जातात. सध्या देशात भाषेचा वाद सुरू झाला आहे. हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही, असे दाक्षिणात्य चित्रपटांचा अभिनेता किचा सुदीपने सांगितल्यावर बॉलीवूडचा अभिनेता अजय देवगणने  त्याला सुनावले. या दोन्ही स्टार्समध्ये कोणताही वाद वाढण्याआधीच आपापसात समेट घडवून आणला गेला, मात्र सोशल मीडियावर हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे की नाही? अशी चर्चा सुरू झाली. देशाची राज्यघटना याबद्दल काय सांगते आणि कोणत्या भाषेला राष्ट्रभाषा म्हणून अधिकृत मान्यता आहे? देशाची अधिकृत राष्ट्रीय भाषा कोणती आहे ते जाणून घेऊया.

हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीभारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि हीच त्याची सर्वात मोठी ओळख आहे. भारतात अनेक भाषा आणि बोली बोलल्या, लिहिल्या आणि वाचल्या जातात. अशा स्थितीत कोणत्याही एका भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. भारतातील मोठी लोकसंख्या हिंदी भाषिक आहे हिंदी न बोलणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तसेच भारतात प्रत्येकाला एकच राष्ट्रीय भाषा शिकण्याची आणि बोलण्याची सक्ती नाही.

14 सप्टेंबरला हिंदी दिवस का साजरा केला जातो?भारताला त्यांच्या भिन्नतेमुळे राष्ट्रभाषा नाही, परंतु सरकारी कार्यालयांमध्ये कामासाठी भाषिक आधार निर्माण करण्यासाठी हिंदीला अधिकृत भाषेचा(राजभाषा) दर्जा देण्यात आला आहे. यासंबंधीच्या महत्त्वाच्या तरतुदी संविधानाच्या भाग 17 मध्येही करण्यात आल्या आहेत.

हिंदी ही राजभाषा कधी झाली?14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला राजभाषेचा दर्जा मिळाला. त्यानंतर 1953 पासून राजभाषा प्रचार समितीतर्फे दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवसाचे आयोजन करण्यात येऊ लागले. भारतीय राज्यघटनेच्या भाग 17 च्या कलम 343(1) मध्ये असे म्हटले आहे की राष्ट्राची अधिकृत भाषा हिंदी आणि लिपी देवनागरी असेल.

मातृभाषा कोणाला म्हणतात?मातृभाषा ही अशी भाषा आहे जी आपण जन्माने शिकतो. आपण जिथे जन्मलो तिथे बोलली जाणारी भाषा स्वतःच शिकली जाते. जी भाषा आपण जन्मानंतर प्रथम शिकतो, तिला आपण आपली मातृभाषा मानतो. आजवर देशात कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळालेला नाही आणि सर्व भाषांना समान आदर व सन्मान मिळाला आहे. देशातील कुठल्याही नागरिकाला संपूर्ण देशात त्याची मातृभाषा बोलण्यास, लिहिण्यास आणि वाचण्याचे स्वातंत्र्य आहे. 

टॅग्स :IndiaभारतAjay Devgnअजय देवगण