राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान
By admin | Updated: December 19, 2014 22:57 IST
अल्पवयीन मुलाचा नरबळी
राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान
अल्पवयीन मुलाचा नरबळी मुजफ्फरनगर-येथील मुकुंदपूर गावात एका तांत्रिकाने सात वर्षांच्या निष्पाप मुलाचा नरबळी दिल्याची अमानुष घटना घडली. एका महिलेच्या मातृत्वासंबंधी समस्येवर तोडगा काढण्यासाठी तांत्रिक रामवीर व त्याचा साथीदार मोनू याने कुलवंत या सात वषांर्ंच्या मुलाचा नरबळी दिला. या दोघांना अटक करण्यात आली असून या महिलेचा शोध सुरू आहे. ----------------------------------आरोग्याधिकाऱ्याला धमकावणाऱ्या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखलकोटा- राजस्थान पोलिसांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.एन. यादव यांना फोनवरून धमकी दिल्याबद्दल व शिवीगाळ केल्याबद्दल भाजपा आमदार प्रल्हाद गुंजल व अन्य एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉ. यादव यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.----------------------------------मौर्य यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटसुलतानपूर-बहुजन समाज पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावण्याच्या एका प्रकरणात स्थानिक न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.अपर मुख्य न्यायिक मॅजिस्ट्रेट सरोजकुमार यादव यांनी हे वॉरंट जारी केले. या प्रकरणाची सुनावणी ५ जानेवारी रोजी केली जाणार आहे.----------------------------------केरळच्या १२ परिचारिका लिबियाहून परतल्याकोच्ची-लिबियातून १२ परिचारिका केरळमध्ये परतल्या आहेत. या परिचारिकांना ट्यूनिशियामार्गे येथे आणण्यात आले. लिबियात आपल्याला पुरेसे अन्न व पाणीही मिळत नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. परिचारिकांचे दुसरे पथक रविवारी कोझीकोड येथे पोहचण्याची शक्यता आहे.----------------------------------वायबी सुब्बा रेड्डी न्यायालयात हजरहैदराबाद- वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी संबंधित प्रकरणात न्यायालयाने पाठविलेल्या समन्सनंतर खासदार वायबी सुब्बा रेडी, आयएएस अधिकारी एस.एन. मोहंती व अन्य आरोपी शुक्रवारी विशेष न्यायालयात प्रथमच हजर झाले. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २९ जानेवारीपर्यंत स्थगित केली आहे.