शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

एलव्हीएम-३ च्या प्रक्षेपणाची उलट मोजणी सुरू

एलव्हीएम-३ च्या प्रक्षेपणाची उलट मोजणी सुरू
चेन्नई-भारताच्या नव्या पिढीतील अंतराळयान जीएसएलव्ही एमके ३ च्या पहिल्या प्रायोगिक चाचणी प्रक्षेपणाची २४ तास ३० मिनिटांची उलटी मोजणी सुरू झाली आहे. येथील श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात ही चाचणी केली जाणार आहे. १८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी हे प्रक्षेपण केले जाईल.
---------------------------------
तामिळनाडूतील कोळी बेमुदत संपावर
रामेश्वरम- श्रीलंकेच्या नौसैनिकांनी अटक केलेल्या कोळ्यांच्या मुक्ततेसोबत अन्य मागण्यांकरिता येथील कोळ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात अनेक जिल्ह्यातील कोळी सहभागी झाले आहेत. या संपामुळे रामेश्वरमच्या जवळपास हजाराहून अधिक नावा उभ्या होत्या.
----------------------------------
जयपूरच्या साहित्योत्सवात कलाम, नासिरुद्दीन शाह व चुंग छांग
नवी दिल्ली- जयपूर येथे २१ ते २५ जानेवारी दरम्यान आयोजित साहित्योत्सवात माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, चीनमध्ये जन्मलेले ब्रिटिश लेखक चुंग छांग व अभिनेता नासिरुद्दीन शाह हे विशेषत्वाने हजेरी लावणार आहेत. या महोत्सवात २३४ वक्ते सहभागी होत आहेत. यात नाटककार गिरीश कर्नाड, विशाल भारद्वाज आदीही आहेत.
----------------------------------
मिझोरममध्ये फरार कैद्याला अटक
एजल- एक वर्षाहून अधिक काळ फरार झालेल्या एका कैद्याला येथील लुंगलई जिल्ह्यात अटक करण्यात आली. लुंगलेई कारागृहातून पळून गेलेल्या संघराज चकमा याला रविवारी पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर हत्येच्या गुन्ह्यासह अन्य गुन्हे दाखल आहेत.
----------------------------------
कतारला राष्ट्रीय दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या शुभेच्छा
नवी दिल्ली-राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कतारच्या राष्ट्रीय दिनानिमित्त त्या देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. कतारचे अमीर शेख तमीम बिन हम्माद अल थानी यांना पाठविलेल्या संदेशात त्यांनी शुभेच्छा देताना दोन्ही देशांमधील परस्परसंबंध मजबूत होतील अशी आशा व्यक्त केली आहे.
----------------------------------
आरएसी तिकिटावर जागा न दिल्याबद्दल उत्तर रेल्वेला दंड
नवी दिल्ली-दिल्लीच्या ग्राहक मंचाने उत्तर रेल्वेला एका व्यक्तीला १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश जारी केले आहेत. जून २०११ मध्ये कटिहार अमृतसर एक्सप्रेसमध्ये आरएसी तिकीट असूनही जागा न दिल्याबद्दल अवधेशकुमार या व्यक्तीने तक्रार नोंदविली होती. त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना तिकीट असूनही हा दीर्घ प्रवास उभ्यानेच करावा लागला होता.
----------------------------------
आंतरराष्ट्रीय तस्कर पोलिसांच्या ताब्यात
लखनौ- पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय तस्कराला पकडून त्याच्याजवळून कोट्यवधी रुपयांची शस्त्रे जप्त केली आहेत. वरिष्ठ पोलीस अधीक्षक यशस्वी यादव यांनी, या आरोपीचे नाव तारिक खान असल्याचे सांगितले. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणावर अद्ययावत शस्त्रे, काडतुसे, तलवारी, खुखरी व अन्य सामान आढळून आले.
----------------------------------
अपहरण प्रकरणातून सपा आमदार बंधू निर्दोष मुक्त
बुलंदशहर-येथील एका न्यायालयाने निवडणुकीदरम्यान मतदारांचे अपहरण केल्याच्या आरोपावरून समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांना मुक्त केले आहे. विशेष न्यायाधीश रजत सिंग जैन यांनी आमदार भगवान शर्मा व मुकेश शर्मा यांना सर्व साक्षीदार उलटल्याने आरोपमुक्त केले.
--------------------------------------