शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुगलसराय रेल्वे स्टेशनचं नाव आता दीनदयाल उपाध्याय, नामकरणावरून राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 15:09 IST

उत्तर प्रदेशमधल्या प्रमुख रेल्वे स्टेशनांपैकी एक असलेल्या मुगलसराय या स्टेशनचं नाव बदलून जनसंघाचे नेते दीनदयाल उपाध्याय यांचं नाव देण्याच्या योगी मंत्रिमंडळाच्या निर्णयाला केंद्रीय गृहमंत्रालयानं मंजुरी दिलीय.

नवी दिल्ली, दि. 4 - उत्तर प्रदेशमधल्या प्रमुख रेल्वे स्टेशनांपैकी एक असलेल्या मुगलसराय या स्टेशनचं नाव बदलून जनसंघाचे नेते दीनदयाल उपाध्याय यांचं नाव देण्याच्या योगी मंत्रिमंडळाच्या निर्णयाला केंद्रीय गृहमंत्रालयानं मंजुरी दिलीय. कोणत्याही स्टेशन, गाव आणि शहराचं नाव बदलण्यासाठी राज्य सरकारांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागतं. जून महिन्यात योगी मंत्रिमंडळानं मुगलसराय रेल्वे स्टेशनचं नाव बदलून दीनदयाल उपाध्याय करण्याचा निर्णय घेतला होता. दीनदयाल उपाध्याय यांचं पार्थिव शरीर मुगलसराय रेल्वे स्टेशनवर सापडल्याचीही या बैठकीत माहिती देण्यात आली होती. जुलैमध्ये योगी सरकारला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्रही मिळालं होतं. योगी सरकारला ना हरकत प्रमाणपत्र बहाल केल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिका-यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच इंटेलिजन्स ब्युरो, जीओग्राफिकल सर्व्हे ऑफ इंडिया, पोस्ट विभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाला स्टेशनचं नाव बदलण्यास कोणतीही हरकत नसल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिका-यांनी सांगितलं होतं. राज्यसभेत गदारोळमुगलसराय रेल्वे स्टेशनचं नाव बदलून जनसंघाचे नेते दीनदयाल उपाध्याय यांचं नाव देण्यात आल्यामुळे आज राज्यसभेत अभूतपूर्व गदारोळ झाला. समाजवादी पक्षाच्या खासदारांनी या नामकरणाला विरोध केला. समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशमधलं सरकार भूगोल बदलण्याचा प्रयत्न करतोय. मुगलसराय हे देशातील सर्वात जुनं रेल्वे स्टेशन आहे, असंही ते म्हणाले आहेत. खरं तर भाजपा यंदा पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं जन्मशताब्दी वर्षं साजरी करतेय. योगी सरकारनं मुगलसराय रेल्वे स्टेशनचं नाव बदलून जनसंघाचे नेते दीनदयाल उपाध्याय यांचं नाव देण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर प्रमुख चौकामध्ये त्यांची प्रतिमा लावून 'त्या' चौकांनाही दीनदयाल उपाध्याय यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सर्व प्रकारावर विरोधकांनी जोरदार आक्षेप नोंदवला होता.