शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक: नवभारताच्या उभारणीसाठी भाजपाचा सहा कलमी अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 02:07 IST

गरिबी, दहशतवाद, सांप्रदायिकता, जातीयवाद, भ्रष्टाचार आणि अस्वच्छता व कच-यापासून देशाला मुक्त करून सन २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘नवभारत’ साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सोमवारी सहा कलमी अजेंडा राबविण्याचा निर्धार केला.

नवी दिल्ली : गरिबी, दहशतवाद, सांप्रदायिकता, जातीयवाद, भ्रष्टाचार आणि अस्वच्छता व कच-यापासून देशाला मुक्त करून सन २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘नवभारत’ साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सोमवारी सहा कलमी अजेंडा राबविण्याचा निर्धार केला.येथील तालकटोरा स्टेडियममध्ये भरलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात अशा आशयाचा ठराव संमत केला गेला. सकाळी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी या बैठकीचे उद््घाटन केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने समारोप झाला. अरुण जेटली व नितीन गडकरी या दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी नंतर अधिवेशनात झालेल्या कामकाजाची पत्रकारांना माहिती दिली. बचाव करण्यासाठी माझ्यामागे कोणी नातेवाईक नाहीत, असे सांगून मोदी यांनी सार्वजनिक व सरकारी व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार आणि लबाडी करणाºयांची जराही गैर करणार नाही, असे ठणकावून सांगितले. राजकीय ठरावात सरकारने हाती घेतलेल्या समाजोद्धाराच्या अनेक योजनांची तारीफ केली.भ्रष्टाचाराविरुद्ध तडजोड नाहीभ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत कोणतीही तडजोड करणार नाही. यात जो कोणी सापडेल त्याची खैर नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निक्षून सांगितले.केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी बैठकीबाबत माहिती दिली. भ्रष्टाचाराबाबत बोलताना मोदी म्हणाले की, भ्रष्टाचारात सापडल्यास कुणाची गय करणार नाही. माझा कोणीही नातेवाईक नाही. काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका करताना ते म्हणाले की, विरोधक सत्तेवर होते तेव्हा सत्ता त्यांच्यासाठी उपभोगाची वस्तू होती आणि आता त्यांना हे समजत नाही की, विरोधी पक्षात कसे राहायचे आहे. अनेकदा विरोधकांकडून कडवट भाषा वापरली जाते. जर सरकारवर कोणताही स्पष्ट आरोप नाही तर अशा भाषेचा वापर हा पर्याय होऊ शकत नाही.

टॅग्स :BJPभाजपा