शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या विधानसभेत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 14:24 IST

नॅशनल कॉन्फरन्सने लोन यांच्या वक्तव्यानंतर या वादातून अंग बाजूला काढून घेतले.

जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत शनिवारी नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार अकबर लोन यांनी 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. आज सभागृहाचे कामकाज सुरु असताना भाजपाचे काही आमदार सभागृहात पाकिस्तानविरोधी घोषणा देत होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अकबर लोन यांनी 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. साहजिकच या घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे. या घटनेनंतर अकबल लोन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्याचे कबुल केले. मात्र, हा माझा वैयक्तिक निर्णय होता. मी 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्याने इतर कोणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, नॅशनल कॉन्फरन्सने लोन यांच्या वक्तव्यानंतर या वादातून अंग बाजूला काढून घेतले. या घटनेविषयी बोलताना नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्ते जुनैद अझिम मट्टू यांनी सांगितले की, लोन यांचे वक्तव्य कदापि खपवून घेण्यासारखे नाही. मी याविषयी आमच्या पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्याशीही बोललो. त्यामुळे आमच्या पक्षातील कोणीही अकबर लोन यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला द्विराष्ट्राचा सिद्धांत मान्य नाही, ही बाब लोन यांनी ध्यानात ठेवायला पाहिजे होती, असे ट्विट अझिम मट्टू यांनी केले. 

टॅग्स :Jammu and Kashmir National Conferenceजम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सPakistanपाकिस्तान