नवी दिल्ली : आयआयटी मद्रासमधील आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल या दलित संघटनेवर बंदी आणल्याची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष पी.एल. पुनिया यांनी या संस्थेला नोटीस जारी केली आहे. दरम्यान द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.मोदी आणि त्यांच्या सरकारच्या धोरणाचा निषेध केल्याबद्दल या संघटनेवर संस्थेने बंदी आणल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मी घडामोडीची स्वत:हून दखल घेत आयआयटीएमला नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दलित संघटनेवरील बंदीची राष्ट्रीय आयोगाकडून दखल
By admin | Updated: June 1, 2015 02:02 IST