शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देश आर्थिक संकटाकडे लोटला जात असताना भाजपा फक्त विरोधकांवर टीका करण्यात मग्न: ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 18:22 IST

देश आर्थिक संकटात लोटला जात असताना केंद्र सरकार मात्र विरोधी पक्षांचं ज्या राज्यात सरकार आहे त्यांच्यावर टीका करण्यात व्यग्र आहे, असा हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केला आहे.

कोलकाता-

देश आर्थिक संकटात लोटला जात असताना केंद्र सरकार मात्र विरोधी पक्षांचं ज्या राज्यात सरकार आहे त्यांच्यावर टीका करण्यात व्यग्र आहे, असा हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केला आहे. मोदी सरकारचं लक्ष फक्त विरोधी पक्षाच्या सरकारांवर आहे. त्यांच्याकडून सीबीआय किंवा इतर केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून भाजपा विरोधी राज्यांमध्ये सरकार चालवलं जात आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला. 

"देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. श्रीलंकेत काय घडतंय ते आपण पाहातच आहोत. भारताची आर्थिक परिस्थिती काही फारशी चांगली नाही. मी काही श्रीलंकेशी तुलना करत नाही. पण आपल्याकडे काहीच प्लानिंग दिसून येत नाही. पेट्रोलच्या दरात गेल्या पंधरा दिवसात तब्बल ११ वेळा वाढ झाली आहे. तर डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती लक्षणीयरित्या वाढत आहेत. पीएफवरील व्याजदरातही मोठी कपात झाली आहे", असं बॅनर्जी म्हणाल्या. 

'केंद्रानं ईडी, सीबीआयपेक्षा पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर लक्ष द्यावं'विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये ईडी आणि सीबीआयचा कसा वापर करता येईल यावर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा केंद्र सरकारनं इंधन दरवाढ कशी रोखता येईल त्याकडे लक्ष द्यावं, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. महागाई हा सर्वसमावेशक मुद्दा असून केंद्रानं तातडीनं या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलवून माहिती जाणून घ्यावी आणि सरकार त्यावर काय काम करत आहे त्याची माहिती द्यावी, असं आवाहनही बॅनर्जी यांनी केलं आहे. 

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी