शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

नसली वाडिया यांचीही टाटा स्टीलमधून हकालपट्टी

By admin | Updated: December 23, 2016 01:37 IST

टाटा स्टीलचे स्वतंत्र संचालक नसली वाडिया यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काल झालेल्या विशेष सर्वसाधारण

नवी दिल्ली : टाटा स्टीलचे स्वतंत्र संचालक नसली वाडिया यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काल झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित असलेल्या ९0.८ टक्के भागधारकांनी वाडिया यांच्या हकालपट्टीच्या बाजूने मतदान केल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.नियामकीय दस्तावेजात कंपनीने ही माहिती दिली. कंपनीचे एकूण ९७.१२ कोटी समभाग आहे. त्यापैकी ६२.५४ कोटींच्या वतीने मतदान झाले. हे प्रमाण ६४.४ टक्के इतके आहे. ठरावाच्या बाजूने ५६.७९ कोटी मते समभाग मते पडली. हे प्रमाण ९0.८0 टक्के आहे. ठरावाच्या विरोधात ५.७५ कोटी मते पडली. हे प्रमाण ९.२0 टक्के आहे. या ठरावाच्या मंजुरीसाठी बहुमताची गरज होती. असे असताना प्रचंड बहुमताने तो मंजूर करण्यात आला.प्रवर्तक आणि प्रवर्तक संस्था यांच्याकडे ३0.४५ कोटी समभाग आहे. त्यापैकी २९.५९ कोटींनी मतदान केले. बिगर-प्रवर्तक भागधारकांपैकी ३२.९५ कोटी भागधारकांच्या वतीने मतदान करण्यात आले. त्यापैकी २७.२0 कोटी मते म्हणजेच ८२.५ टक्के मते ठरावाच्या बाजूने पडली. प्रवर्तकांची मते बाजूला ठेवली तरी ठरावाच्या बाजून तीन चतुर्थांश मते राहतात. हे मोठे बहुमत आहे. औद्योगिक गुंतवणूकदारांचे ४२.६४ कोटी समभाग आहेत. त्यापैकी ३१.९९ कोटींचे मतदान झाले. त्यापैकी ८२.५ टक्के मते वाडिया यांच्या हकालपट्टीच्या बाजूने पडली. अन्य सर्व प्रवर्गातील समभागधारकांनीही ठरावाच्या बाजूने मतदान केले. (वृत्तसंस्था)मिस्त्री यांच्या कौटुंबिक कंपन्यांच्या याचिकांवर तातडीचा दिलासा नाहीसायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या कंपन्यांच्या वतीने टाटा सन्सच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कोणत्याही प्रकारे हंगामी आदेश निर्गमित करण्यास राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने नकार दिला आहे. सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. या प्रकरणी सायरस इन्व्हेस्टमेंट प्रा.लि. आणि स्टर्लिंग कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. टाटा सन्समधील गैरव्यवस्थापन, दडपशाही आणि गैरप्रकारांची चौकशी करण्याचे आदेश देण्याची विनंती लवादाला करण्यात आली आहे. हे प्रकरण बी.एस.व्ही. प्रसाद कुमार (सदस्य-न्यायालयीन) आणि व्ही. नल्लासेनपथी (सदस्य-तांत्रिक) यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आले. दोन्ही याचिकांची सुनावणी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी करण्याचा निर्णय खंडपीठाने दिला. त्याआधी कोणताही आदेश निर्गमित करण्यास खंडपीठाने नकार दिला. या प्रकरणात सायरस मिस्त्री हे ११ क्रमांकाचे प्रतिवादी आहेत. त्यांना एक आठवड्याच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. टाटा सन्स आणि अन्य प्रतिवादींना १५ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याच आदेश लवादाने दिले आहेत. मिस्त्री यांच्या उत्तरावर आपले म्हणणे मांडण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. त्यानंतर १५ दिवसांनी रिजाइंडर सादर करण्याचे आदेश याचिकाकर्त्या कंपन्यांना देण्यात आले आहेत.च्याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा देण्याऐवजी या प्रकरणाची गतीने सुनावणी घेण्यास प्राधान्य देणार असल्याचे लवादाने स्पष्ट केले. त्यानंतर सर्व पक्षांच्या सहमतीनंतर ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय दिला. आधी याचिकेच्या वैधतेवर युक्तिवाद करा, त्यानंतर गुणवत्तेचे पाहू, असेही लवादाने पक्षकारांना सांगितले.