नाशिक- शाही मिरवणूक जोड
By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST
मिरवणुकीत उंटांचा सहभाग
नाशिक- शाही मिरवणूक जोड
मिरवणुकीत उंटांचा सहभाग शाही मिरवणुकीत दिंगबर आखाड्याकडून हत्ती सहभागी केला जाणार होता, परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने हत्तीच्या सहभागास परवानगी दिली नाही. त्यामुळे या आखाड्याच्या महंतांना हातात निशान घेऊन चरणचालीने मिरवणुकीत सहभागी व्हावे लागले. मात्र निर्मोही आखाड्याच्या मिरवणुकीत दोन उंटांवर बसवून नगारे वाजवणारे वादक सहभागी झाले होते.--* रात्रीपासूनच साधुग्राम भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. सकाळीही सर्वच आखाडे आणि खालशे ढोलताशा आणि वाद्यवृदांनी दुमदुमूून गेले होते.* सकाळी मिरवणूक सुरू झाल्यानंतर साधू-महंतांबरोबरच अनेक भाविक सहभागी झाले होते.* रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांना बॅरिकेड टाकून अडविण्यात आले असतानाही ते मोठ्या उत्साहाने मिरवणुकीतील साधू-महंतंाचा आणि प्रभू रामचंद्रांचा जयघोष करीत होते.* शहरातील सिंहस्थ ग्रामोत्सव समिती समिती, सनातन धर्म संस्था, यजुर्वेदीय ब्रााण संस्था तसेच अन्य संस्थांनी झाले होते.* पंचमुखी हनुमान मंदिराजवळ प्रथम आखाडा आल्यांनतर हनुमानाला वंदन करण्यात आले. महंत भक्तिचरणदास यांनी आखाड्याचे स्वागत केले. त्यानंतर मिरवणूक पुढे गेली.* आडगावनाका येथे मिरवणूक आल्यानंतर आमदार बाळासाहेब सानप यांनी मिरवणुकीचे स्वागत केले. यावेळी आमदार देवयानी फरांदे तसेच अन्य राजकीय नेते उपस्थित होते.* आडगाव नाका येथून अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी मिरवणुकीत सहभागी झाले होते. * सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक शाही मिरवणुकीत अनेक साध्या वेशातील पोलीस सहभागी होते. विशेष म्हणजे अनेकांनी दाढी, मिशा वाढवून साधूंच्या रूपातच ते सामील झाले होते.---ग्यानदासांनी नोटा उधळल्याशाही मिरवणुकीत भाविकांना प्रसाद पुष्पे किंवा प्रसाद, अथवा नाणे किंवा नोटा उधळण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. निर्वाणी आखाड्याचे श्री महंत ग्यानदास यांनी मिरवणूक मार्गावर नोटा उधळल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. बारा वर्षांपूर्वी म्हणजेच २००-०३ मध्ये भरलेल्या कुंभमेळ्यात नाशिकमध्ये एका महंतांनी चांदीचे नाणे उधळल्या आणि ते घेण्यासाठी भाविकांची धावपळ झाल्यानेच चेंगराचेंगरी झाली होती. त्यात ३३ भाविकांचा बळी गेला होता. त्यावेळी महंतांची नाणी उधळण्याची कृती माजी महापौर (कै.) उत्तमराव ढिकले यांनी उघड केली होती. त्याला यानिमित्ताने उजाळा मिळाला.