शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! कोरोनाच्या नेझल लसीच्या वापराला भारतात परवानगी, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 17:43 IST

जागतिक पातळीवर कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होत असताना भारतात आता कोरोना विषाणू विरोधातील नेझल लसीच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली-

जागतिक पातळीवर कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होत असताना भारतात आता कोरोना विषाणू विरोधातील नेझल लसीच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लसींना मान्यता देणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीने आज नेझल लसीला परवानगी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरोधातील तयारीचा आढावा घेत उच्चस्तरिय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीनंतर नेझल लसीला मान्यता देण्यात आली आहे. 

कोरोना लसीचं इंजेक्शन घेण्याची इच्छा नसणाऱ्या लोकांसाठी नेझल लस हा मोठा दिलासा ठरणार आहे. नाकावाटे स्प्रेच्या स्वरुपात दिली जाणारी लस इंजेक्टेबल लसीपेक्षा चांगली मानली जात आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील आजच्या उच्चस्तरिय बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्य सचिव राजेश भूषण, नीती आयोगाचे डॉ व्ही के पॉल व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित होते.

नेझल लस चांगली आहे का?कोरोना लसीच्या तुलनेत नाकावाटे दिली जाणारी लस फायदेशीर आहे. कारण या लसीची साठवण, वितरण आणि कमी कचरा निर्मिती यासोबतच विषाणूचे एन्ट्री पॉइंट असलेल्या नाक आणि श्वसनमार्गाला संरक्षण नेझल लस प्रदान करते. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी जनतेला लसीकरण करून घेण्याचं आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्यासोबतच कोविड नियमांचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. 

१ डिसेंबर रोजी भारताच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने १८ आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांना आणीबाणीच्या परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी भारतानं विकसित केलेल्या जगातील पहिल्या इंट्रा-नेझल लस मंजूर केली होती. चीनने देखील इनहेलेबल लस तसेच नेझल-स्प्रे लस मंजूर केली आहे. रशिया आणि इराणनेही त्यांच्या स्वतःच्या नेझल लस विकसित केल्या आहेत.

दरम्यान, गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात १८५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संध्या ३,४०२ इतकी आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस