शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोदींच्या ‘उडान’ योजनेची हवाई क्षेत्रात गरुडभरारी; नवी ७० विमानतळे उभारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 07:36 IST

नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी साधला ‘लोकमत’शी संवाद

सुरेश भुसारीनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘उडान’ या योजनेतून देशातील हवाई क्षेत्रात क्रांती झाली असून, गेल्या सहा वर्षांत देशात नव्या ७० विमानतळांची उभारणी झाली, तर ११ नव्या विमान कंपन्यांनी विमानसेवा सुरू केली. यात ३ स्टार्टअपचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी ‘लोकमत’ला विशेष मुलाखत दिली. यात देशाने हवाई क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आलेख मांडला, तर महाराष्ट्रात हवाई क्षेत्रात मोठी संधी असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. कोल्हापूर-नाशिक विमानसेवेने जोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या उडान योजनेबद्दल ते म्हणाले, विमानाने प्रवास केवळ मोठ्या शहरातील लोकांची मक्तेदारी राहू नये या उद्देशाने पंतप्रधानांनी ही योजना सुरू केली. 

या योजनेने देशाच्या हवाई क्षेत्रात क्रांती घडविली आहे. दरभंगासारख्या शहरात विमानाने जाणे शक्य झाले आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे तर कोल्हापूर, नाशिक ही शहरे विमानसेवेने जोडली आहेत.

‘उडे देश के आम नागरिक’ साकारया योजनेतून देशात नवी ७० विमानतळे उभारली आहेत. गेल्या ६ वर्षांत १ कोटी १० लाख प्रवाशांचा टप्पा आपण ओलांडला आहे. हे लक्षात घ्या की, या काळात सारे जग कोरोनाचा सामना करीत होते. तरीही आपण हे लक्ष्य साध्य केले आहे. या काळात २ लाख १५ हजार विमानांची उड्डाणे झाली. देशात ४५३ विमाने उपलब्ध आहेत. हे सर्व पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकार झालेले आहे. ७०० विमानांची आवश्यकता आहे. भविष्यात दरवर्षी १०० विमानांची भर पडणार आहे. ‘उडे देश के आम नागरिक’ हे पंतप्रधानांचे स्वप्न या योजनेने साकार झाले आहे. 

एमआरओत देश स्वावलंबीएमआरओच्या क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून ते म्हणाले, साफ्रान या कंपनीने देशात १५० मिलियन डॉलरची गुंतवणूक करण्यासाठी करार केला आहे. विमानांची दुरुस्ती स्वदेशी तंत्रज्ञानाने झाली पाहिजे, हे केंद्र सरकारचे  ध्येय आहे.

महाराष्ट्राने व्हॅट कमी करावा : एअर टर्बाईन फ्युएलवरील व्हॅट महाराष्ट्रात १६ ते २० टक्के व्हॅट आकारला जातो, हवाई क्षेत्रात महाराष्ट्राला प्रगती करावयाची असल्यास व्हॅट १ ते ४ टक्के असला पाहिजे. याशिवाय या क्षेत्रात महाराष्ट्राला प्रगती साधता येणार नाही, असेही मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

एफआरटीप्रणाली पुण्यातही : विमानतळावर नुकतीच फेसियल प्रणाली सुरू झाल्याचे सांगून मंत्री शिंदे म्हणाले, प्रवाशांचे बोर्डिंग कमी वेळात व्हावे यासाठी सध्या तीन विमानतळांवर ही प्रणाली आहे. दुसऱ्या टप्प्यात पुणे, हैदराबाद, कोलकाता व विजयवाडा या विमानतळांवर ही प्रणाली सुरू होईल. 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी