शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
ना पाकिस्तान, ना अफगानिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकानंच केला खुलासा
3
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
4
इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
6
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
7
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
8
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
9
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
10
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
11
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
12
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
13
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
14
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
15
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
16
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
17
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
18
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
19
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
20
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?

नरेंद्र मोदींचा रामजप!

By admin | Updated: May 6, 2014 15:37 IST

भाजपाच्या जाहीरनाम्यात अयोध्येतील राममंदिराच्या मुद्दय़ाला अग्रक्रम नसावा, यासाठी आग्रही राहिलेल्या नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील फैझाबादेत मतांसाठी राम धून आळवली

काँग्रेसची तक्रार : निवडणूक आयोगाने मागविला अहवालफैझाबाद : भाजपाच्या जाहीरनाम्यात अयोध्येतील राममंदिराच्या मुद्दय़ाला अग्रक्रम नसावा, यासाठी आग्रही राहिलेल्या नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील फैझाबादेत मतांसाठी राम धून आळवली. फैझाबाद येथे प्रचारसभेत मोदी यांच्या मंचावर भगवान रामाचे मोठे ‘पोस्टर’ लावण्यात आले होते. मोदी यांनी प्रत्यक्ष राममंदिर निर्मितीच्या मुद्दय़ावर कुठलेही भाष्य केले नाही, परंतु वारंवार रामनाम घेतले. त्यांनी प्रचारात धर्माचा वापर केल्याच्या मुद्दय़ावरून काँग्रेस आक्रमक झाली असून, निवडणूक आयोगाने या सभेचा अहवाल मागितला आहे. अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी याच फैझाबाद मतदारसंघात आहे. निवडणुकीत जनतेने जिंकून दिल्यास देशात रामराज्य आणेन, असा दावा मोदींनी केला. मोदी म्हणाले, भगवान रामाच्या या भूमीतील लोक ‘प्राण जाए पर वचन न जाए’ या उक्तीवर विश्‍वास ठेवतात. सत्तेत असलेल्या पक्षांनी १0 कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती. हे आश्‍वासन पूर्ण न करणार्‍यांना माफ करणार का, असा सवालही त्यांनी केला.

आपके मुंह मे घी-शक्करकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मी पंतप्रधानासारखा वागतो असे म्हटले, यावर मी काय वक्तव्य देऊ. ‘आप के मुंह में घी-शक्कर’ या शब्दांत सोनिया गांधी यांचे आभार मानले. ‘दिल मांगे मोअर’ या मोदी यांच्या वक्तव्याबाबत काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपासंदर्भात मोदी यांनी प्रत्युत्तर दिले. एका गरीब महिलेचा मुलगा मागणार नाही तर करणार काय? त्यांना मत मागायला लाज वाटत असेल, परंतु मला वाटत नाही, असे ते म्हणाले.भाषण व पोस्टरची गंभीर दखलमोदी यांच्या फैझाबाद येथील प्रचारसभेदरम्यान त्यांचे भाषण व मंचावर लागलेल्या ‘पोस्टर’संदर्भात निवडणूक आयोगाने स्थानिक प्रशासनाकडून अहवाल मागितला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी ही बाब स्पष्ट केली.गुजरातमध्ये रामराज्य का नाही? मोदी देशात रामराज्य आणण्याची भाषा करीत आहेत; मग त्यांनी गुजरातमध्ये रामराज्य का आणले नाही. गुजरातमध्ये अत्याचारांचे सत्र अजूनही सुरूच आहे. ते रामराज्याचा वापर फक्त मतांसाठी करीत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसच्या अखिलेश प्रतापसिंह यांनी टीका केली आहे.