शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी गुरूजींची ‘परीक्षा पे चर्चा’; स्वत:च्या क्षमतांना आव्हान द्या, वाढेल तुमचा आत्मविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:26 IST

‘आज मी विद्यार्थी आणि तुम्ही सगळे परीक्षक आहात. तुम्हीच मला १० पैकी गुण द्या. गुण देताना मी पंतप्रधान आहे, हा विचार मनात आणू नका. असे समजा की मी तुमचा मित्र आहे,’ अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी दहावी व बारावीच्या परीक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्यावरील परीक्षेचा ताण हलका करण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली : ‘आज मी विद्यार्थी आणि तुम्ही सगळे परीक्षक आहात. तुम्हीच मला १० पैकी गुण द्या. गुण देताना मी पंतप्रधान आहे, हा विचार मनात आणू नका. असे समजा की मी तुमचा मित्र आहे,’ अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी दहावी व बारावीच्या परीक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्यावरील परीक्षेचा ताण हलका करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनीही पंतप्रधानांनी मनमोकळेपणाने प्रश्न विचारले.विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून खास परीक्षा पे चर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना अनेक प्रश्न विचारले. काहींनी शंकाही विचारल्या. या कार्यक्रमाला अनेक पालकही उपस्थित होते. या विद्यार्थ्यांचे मोदी आज गुरूजीच बनले होते. यावेळी मोदी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी येणारा तणाव कसा घालवायचा आणि आत्मविश्वास कसा वाढवावा याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपण अनेकदा प्रामाणिकपणे तयारी करतो, परंतु आत्मविश्वास नसेल तर तुम्ही अखेरच्या क्षणी काही गोष्टी विसरू शकता. कठोर मेहनतीसोबत आपण सतत स्वत:च्या क्षमतांना आव्हान द्यायला हवे. त्यातूनच आत्मविश्वास वाढेल. आपण सतत कामगिरी आणखी चांगली कशी करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.विद्यार्थ्यानेच घेतली पंतप्रधानांची फिरकी!दिल्लीच्या अकरावीत शिकणाºया गिरीश सिंहच्या एका प्रश्नाने पंतप्रधानांची फिरकी घेतली. गिरीशने विचारले की, सर, पुढच्या वर्षी आपण दोघांचीही परीक्षा आहे. माझी बारावीची परीक्षा आहे आणि तुमच्यासाठी लोकसभा निवडणुकीची. मग तुम्ही या परीक्षेसाठी तयार आहात का, तुम्ही यामुळे अस्वस्थ आहात का? गिरीशचा हा प्रश्न ऐकताच हास्यकल्लोळ उडाला. यावर मोदी यांनी गंमतीने गिरीशला थेट पत्रकार बनण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, तू ज्या पद्धतीने प्रश्न विचारला तसा केवळ पत्रकारच विचारु शकतात!अनेक लोकांना असे वाटते एकाग्रता हा गुण प्रयत्नपूर्वक शिकावा लागतो. परंतु लक्षात घ्या आपल्यातील प्रत्येक जण दिवसभरात काही ना काही कामे अगदी मन लावून करीत असतो. आत्मविश्वास विकत मिळत नाही. तो स्वत:हून मिळवावा लागतो.- पंतप्रधान मोदी

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी