शहरं
Join us  
Trending Stories
1
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
2
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
3
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
4
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
5
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
6
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
7
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
8
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
9
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
10
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
11
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
12
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
13
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
14
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
15
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
16
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
17
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
18
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
19
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
20
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी

नरेंद्र मोदी भाजपा युगातील श्रावणकुमार - आप

By admin | Updated: July 13, 2017 18:00 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपायुगातील श्रावणकुमार असल्याचे आम आदमी पार्टीनं म्हटलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 - पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपायुगातील श्रावणकुमार असल्याचे आम आदमी पार्टीनं म्हटलं आहे. आप पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर नरेंद्र मोदी यांचे एक कार्टून शेअर केले आहे. त्याखाली त्यांनी भाजपा युगातील श्रावण कुमार असे लिहले आहे. आपने ट्विटरवर पोस्ट केलेल्या कार्टूनमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर टीका केली आहे. मोदी हे अडानी आणि अंबानी यांचे श्रावणकुमार असल्याची टीका आपनं या पोस्टमध्ये केली आहे.

आप पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर शेअर केलेल्या कार्टूनमध्ये नरेंद्र मोदी श्रावणकुमार सारखे खांद्यावर कावड घेतलेलं दाखवण्यात आले आहे. कावडच्या एका टोकरीमध्ये अडानी तर दुसऱ्या टोकरीमध्ये अंबानी दाखवण्यात आले आहेत. तसेच मोदींच्या विदेश दौऱ्यावरही टीका केली आहे. विदेश दौऱ्यातून मोदी अडानी आणि अंबानीला मदत करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आपनं शेअर केलेल्या कार्टूननुसार ऑस्ट्रेलियामध्ये मोदीमुळे अडानीना कोळाशाच्या खाणीची मंजुरी मिळाली आहे. तर बांगलादेशमध्येही एका प्लांटला मंजुरी मिळाल्याचा दावा आपनं केला आहे. कार्टूनमध्ये एका ठिकाणी मुकेश अंबानीने अमेरिकासोबत केलेल्या 15 हजार कोटींरुपये किंमतीच्या करारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.दरम्यान, आप पक्षाने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटीझन्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अबेध बालकने मुख्यमंत्री केजरीवाल आणि पाकिस्तान उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा फोटो शेअर करत भारतयुगचे जयचंद असे कॅपशन दिलं आहे. राकेश जयजंच आपली प्रतिक्रिया देताना मोदीचं हेच खरे रुप असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे मास्टर यांनी केजरीवालवर निशाना साधला आहे. ते म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मजाक उडवणाऱ्या पार्टीचे विचार अणखी कसे असू शकतात. असल्या कारनाम्यामुळे आप पक्षाचे कार्यकर्ते खूश होतील भारतीय नाही.