शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

लोकसभेत पराभव, तरीही मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ; भाजपाने काँग्रेसमधून आलेल्या रवनीतसिंग बट्टू यांना दिली संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 23:43 IST

Narendra Modi Oath Ceremony : पंजाबचे भाजप नेते रवनीत सिंग बिट्टू यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिली आहे.

Narendra Modi Oath Ceremony : लोकसभा निवडणुकीत एनडीए'ने बहुमत मिळवले. आज नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये भाजपला एकही जागा मिळवता आली नाही, पण तरीही भाजाने पंजाबच्या रवनीत सिंग बिट्टू यांना मंत्रिमंडळाची शपथ दिली आहे.बिट्टू यांनी रविवारी मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. बिट्टू लुधियानामधून काँग्रेसच्या अमरिंदर सिंग राजा वारिंग यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभूत झाले होते. पराभूत होऊनही भाजपाने त्यांना मंत्रि‍पदावर संधी दिली आहे.

Narendra Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन मंत्रिमंडळ तयार; पाहा संपूर्ण यादी, महाराष्ट्रातून कोणी घेतली शपथ?

बिट्टू हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू आहेत. मुख्यमंत्रीपद भूषवताना बेअंत सिंग यांची दहशतवादी हल्ल्यात हत्या झाली. बिट्टू त्यांच्या प्रोफाइलमुळे मोदी 3.0 चा भाग बनले आहेत कारण भाजप पंजाबमध्ये आपले अस्तित्व मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. मंत्र्यांची निवड करताना भाजपला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील दारूण पराभवही लक्षात ठेवावा लागेल.

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ घेणाऱ्या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, जगत प्रकाश नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारामन, डॉ. एस. जयशंकर, मनोहर लाल, एचडी कुमारस्वामी, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, जितन यांचा समावेश आहे. राम मांझी, राजीव रंजन सिंग, सर्बानंद सोनोवाल, वीरेंद्र कुमार, राम मोहन नायडू, प्रल्हाद जोशी, जुआल ओराव, गिरीराज सिंह, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य सिंधिया, भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी, किरेन सिंह पुजिजू, डॉ.मनसुख मांडविया, जी किशन रेड्डी, चिराग पासवान, सीआर पाटील यांचा समावेश आहे.

नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ

लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालात भारतीय जनता पक्षाने २४० जागा जिंकल्या आहेत आणि एनडीएने २९३ जागा जिंकल्या आहेत. तर तेलुगू देसम पक्षाने १६ तर जनता दल युनायटेडने (जेडीयू) १२ जागा जिंकल्या आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंप्रमाणेच नरेंद्र मोदीही सलग तीन वेळा सार्वत्रिक निवडणुका जिंकून तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत.

टॅग्स :narendra modi oath ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीNarendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाब