शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नरेंद्र मोदी इस्त्रायल दौ-यासाठी रवाना, इस्त्रायलला जाणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान

By admin | Updated: July 4, 2017 11:26 IST

गेल्या सत्तर वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांनी इस्त्रायलला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा असलेल्या इस्त्रायल दौ-यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना झाले आहेत. नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या इस्त्रायल दौ-यावर असणार आहेत. गेल्या सत्तर वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांनी इस्त्रायलला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे इस्त्रायलमधील माध्यमे आणि लोकांमध्ये या दौऱ्याबद्द्ल जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील असे मत इस्रायली आणि भारतीय माध्यमांनी व्यक्त केले आहे.  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनीही आपण या दौऱ्याबाबत आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत उत्सुक असल्याचे सांगितले.  यापुर्वी दोन्ही नेत्यांची विविध आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर भेट झालेली आहे.  
 
(पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे भारत- इस्रायल संबंध दृढतेच्या दिशेने)
(नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी बेने इस्रायली समुदाय उत्सुक)
(नरेंद्र मोदी झोपणार ट्रम्पच्या बेडवर)
 
नरेंद्र मोदी हे इस्रायलला जाणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्या दौऱ्याबाबत इस्रायलमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांची योग्य प्रकारे सुरक्षा आणि इतर व्यवस्था योग्यप्रकारे होण्याची काळजी तेथे घेतली जात आहे. इस्रायलच्या माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वात महत्त्वाचे पंतप्रधान म्हणून नावाजले आहे. जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार इस्रायली अधिकाऱ्यांसाठी डोनल्ड ट्रम्प यांच्या भेटीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट अधिक त्रासदायक ठरणारी आहे. पण ट्रम्प यांच्यांभेटीच्या तुलनेत मोदी यांच्या भेटीबाबत बंधने कमी आहेत.मोदी यांच्या भेटीसाठी किंग डेव्हीड हॉटेलचे पार्किंग आणि वरचा मजला रिकामा करण्यात आला आहे. या हॉटेलचे अध्यक्ष मालकल फेडरमन देखिल मोदींची भेट घेणार आहेत. फेडरमन हे संरक्षण इलेक्ट्रीक कंपनी एल्बिट सिस्टमचे अध्यक्ष आहेत. ही  या कंपनीचेही भारताशी व्यापारी संबंध आहेत.
 
भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये शेती, पशुपालन, संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये व्यापारी संबंध आहेत. मौल्यवान खडे, तंत्रज्ञान, रसायने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, प्लास्टीक, खते, कपडे, औषधे अशा अनेक वस्तूंची आयात निर्यात हे देश करत असतात. या दोन्ही देशांनी २०१४ साली ४.५२ अब्ज डॉलर्सचा व्यापार (संरक्षण क्षेत्रातील खरेदी-विक्री वगळून) केला आहे. इस्रायलमध्ये तयार होणारे संरक्षण साहित्य खरेदी करणारा भारत हा सर्वात मोठा देश आहे.
 
भारत आणि इस्रायल यांचे संबंध आज इतक्या वेगाने सुधारत असले तरी हा वेग गेल्या 70 वर्षांमध्ये कायम नव्हता. 1947 साली पॅलेस्टाइनचे विभाजन करण्याविरोधात भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये मत दिले होते. त्याचप्रमाणे इस्रायलच्या यूएनमधील प्रवेशासही भारताने 1949 साली विरोध केला होता. 1950 साली भारताने इस्रायलला कायदेशीर मान्यता दिली. याबाबत बोलताना भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु म्हणाले होते, ही मान्यता आम्ही यापुर्वीच देऊ शकलो असतो, पण मध्यपुर्वेतील आमच्या अरब मित्रांना न दुखावण्याची आमची इच्छा होती. 1953 साली इस्रायलला मुंबईत वाणिज्य दुतावास उघडण्याची परवानगी मिळाली. 1950 ते 1990 या काळात भारत आणि इस्रायल यांचे संबंध अनौपचारिक स्वरुपाचे राहिले. अर्थात या काळामध्ये विविध आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर दोन्ही देशांचे नेते भेटत होतेच. 1992 साली दोन्ही देशांनी मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित केले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन भारतात आले, त्यानंतर हे संबंध अधिक वाढीस लागले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने ते सर्वाधीक चांगल्या स्थितीत आहेत असे म्हणावे लागेल.
 
भारत-इस्रायल यांच्यांमधील राजनैतिक संबंध
 
1992 - दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित
 
1997- इस्रायलचे राष्ट्रपती एझर वाइझमन यांची भारताला भेट
 
2000- उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांची इस्रायलला भेट
 
2003- इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांची भारतास भेट
 
2006- तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार, कपिल सिब्बल, कमलनाथ यांची  इस्रायल भेट
 
2012- परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची इस्रायलला भेट
 
2014- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेत्यानाहू यांची न्यू यॉर्कमध्ये भेट. 
 
2014- ट्वीटरवर नरेंद्र मोदी यांनी हिब्रूमधून हनुक्का या ज्यू सणाच्या शुभेच्छा दिल्या, त्याला नेत्यानाहूंचा हिंदीतून प्रतिसाद
 
2014- गृहमंत्री राजनाथ सिंह यांची इस्रायलला भेट
 
2015- इस्रायलचे परराष्ट्रमंत्री मोशे यालोन यांची भारत भेट (पंतप्रधानांशीही संवाद)
 
2015- भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पॅलेस्टाइन आणि इस्रायलला भेट. इस्रायलची संसद नेसेटमध्ये भाषण. असे भाषण देणारे व इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती
 
2016 - जानेवारी महिन्यामध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इस्रायलला भेट दिली. यावेळेस इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी चर्चा केली.
 
2016- नोव्हेंबर महिन्यामध्ये इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रियुविन रिवलिन यांनी भारताला भेट दिली. यावेळेस त्यांनी मुंबईत खाबाद हाऊसलाही भेट दिली.