शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

संसदेच्या मंजुरीशिवाय मोदी सरकारकडून 1157 कोटींची उधळपट्टी, CAGच्या अहवालात धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 21:12 IST

कॅगचा अहवाल आज संसदेत मांडण्यात आला आहे. या अहवालात मोदी सरकारच्या अर्थ मंत्रालयासंदर्भात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

नवी दिल्लीः कॅगचा अहवाल आज संसदेत मांडण्यात आला आहे. या अहवालात मोदी सरकारच्या अर्थ मंत्रालयासंदर्भात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. मोदी सरकारनं संसदेची परवानगी न घेता 1156 कोटी रुपये खर्च केल्याचं संसदेत ठेवण्यात आलेल्या कॅगच्या अहवालातून समोर आलं आहे. कॅगच्या अहवालात अर्थ मंत्रालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षाचा कॅग अहवाल सादर करण्यात आला असून, त्यात मोदी सरकारनं संसदेची पूर्व परवानगी न घेता कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा ठपका ठेवला आहे. 

केंद्र सरकार संसदेच्या मंजुरीशिवाय निर्धारित रकमेपेक्षा जास्त (अतिरिक्त) पैसे खर्च करू शकत नाही. कॅगचा अहवाल फायनान्शियल ऑडिट ऑफ द अकाऊंट्स ऑफ द युनियन गव्हर्नमेंटच्या नावानं संसदेच्या पटलावर ठेवण्यात आला. तसेच कॅगच्या अहवालात केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आलं आहे. कॅगच्या रिपोर्टनुसार, अर्थ मंत्रालय नवी प्रणाली विकसित करण्यात अयशस्वी ठरले आहे. त्यामुळेच अतिरिक्त खर्च झाला. तसेच मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आर्थिक प्रकरणात मंत्रालयानं खर्च होणारा पैसा जमा करण्याची कोणतीही उपाययोजना केलेली नाही. नव्या योजना, नव्या सुविधा राबवण्यासह सबसिडी देण्यासाठी संसदेची मंजुरी घेणे गरजेचं असते. लोकलेखा समितीच्या अहवालातही मोदी सरकारनं सबसिडी वाढवण्याच्या घेतलेल्या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी या नियोजनबद्ध नसल्याचा ठपका लोकलेखा समितीच्या अहवालात ठेवण्यात आला. तसेच अर्थ मंत्रालयाला नियम आणि कायद्या संदर्भातील माहितीचा अभाव आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा आणण्यासाठी अर्थ मंत्रालयाला प्रभावी कार्यप्रणालीची अंमलबजावणी करणे गरजेचं असल्याचंही लोकलेखा समितीच्या अहवालात म्हटलं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी