शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

हरीश गुप्ता/ महत्त्वाचे चिटफंड कंपन्यांविरुद्ध पाश आवळणार मोदी सरकारने पुकारले युद्ध : ईडी, सीबीआयकडून तपासाला गती

By admin | Updated: August 16, 2015 23:44 IST

हरीश गुप्ता/ नवी दिल्ली : मोदी सरकारने विविध राज्यांमधील चिटफंड कंपन्यांविरुद्ध अक्षरश: युद्ध छेडले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी)मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (२००२)५७ प्रकरणे नोंदविली आहेत. सीबीआयनेही २०१४-१५ या काळात ६५ प्रकरणे नोंदवत तपासचक्रे फिरविली आहेत.

हरीश गुप्ता/ नवी दिल्ली : मोदी सरकारने विविध राज्यांमधील चिटफंड कंपन्यांविरुद्ध अक्षरश: युद्ध छेडले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी)मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (२००२)५७ प्रकरणे नोंदविली आहेत. सीबीआयनेही २०१४-१५ या काळात ६५ प्रकरणे नोंदवत तपासचक्रे फिरविली आहेत.
कंपनी व्यवहार मंत्रालयाने १३९ प्रकरणांचा तपास गंभीर घोटाळे तपास कार्यालयाकडे(एसएफआयओ) सोपविला आहे. पूर्व आणि ईशान्य राज्यांमध्ये पॉन्झी योजनांचे पीकच आल्याचे धक्कादायक तथ्य तपासात उघड झाले.स्कॅनरखाली असलेल्या चिटफंड कंपन्यांचा डाटा तपासण्यासाठी संगणकीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे. संपुआ सरकारच्या काळात २०१३ पर्यंत केवळ ७ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या, मात्र २०१४ ते जून १५ पर्यंत या तक्रारींची संख्या ६५ पर्यंत गेली आहे. ईडीने अशा कंपन्यांची ११३३.२५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली असून तीन प्रकरणी मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत खटले दाखल केले आहेत.
सेबीने सहारा समूहावर धडक कारवाई करीत दणका दिला आहे. प. बंगाल, झारखंड, ईशान्येकडील राज्यांसह ओडिशा आणि अन्य राज्यांमध्येही चिटफंड घोटाळ्यात अडकलेले राजकारणी आणि प्रभावशाली व्यक्ती कारवाईच्या बडग्याने हादरले आहेत. चिटफंड कंपन्यांनी गोळा केलेला पैसा गुंतवणूकदारांना परत करण्याचा आदेश सेबीने दिला आहे. सेबीला ज्यादा अधिकार देण्यात आल्यापासून सुधारित कायद्यानुसार तपास आणि खटल्यांना गती देण्यासह निधी गोळा करण्यावरही नियंत्रण आणले गेले आहे.
----------------------------
आंतर मंत्रालय गट
चिटफंड कंपन्या आरबीआयच्या नियमन चौकटीत येत नसल्यामुळे या कंपन्यांकडे होत असलेल्या गुंतवणुकीवर कोणतेही नियमन नसल्याच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या कायदेशीर चौकटीतील पळवाटा बंद करण्याबाबत सरकारने आंतर मंत्रालय गटाची स्थापना केली आहे. चिट फंड कायदा १९८२ नुसार त्या त्या राज्यांकडून गुंतवणुकीची नोंद आणि नियमन केले जाते. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्थापन केलेल्या आंतर मंत्रालय गटाकडून कंपन्यांच्या गुंतवणूक योजनांवर नियमन आणण्यासाठी मजबूत असा आराखडा तयार केला जाईल. समन्वयासाठी एक यंत्रणा स्थापन करण्यात आली असून राज्यस्तरीय समन्वय समित्या(एसएलसीसी)आरबीआय, सेबी आणि अन्य अंमलबजावणी संस्थांशी समन्वय राखण्याचे काम करेल. मे २०१४ मध्ये या समित्यांची पुनर्रचना करण्यात आली. या समित्यांची बैठकींमध्ये सातत्य राखले जात असून यापूर्वी दर सहा महिन्यांनी होणार्‍या बैठकी आता तीन महिन्यांनी होत आहे.