शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

भारताचा ड्रॅगनला मोठा धक्का!; आता टिकटॉक, यूसी ब्राउझरसह 59 चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 09:08 IST

गेल्या जून महिन्यापासून सरकारने ज्या 267 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. त्यांत या कायमची बंदी घातलेल्या 59 अ‍ॅप्सचादेखील समावेश आहे. भारत सरकारने सर्वप्रथम जून महिन्यात टिकटॉक सह 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती.

ठळक मुद्देगेल्या जून महिन्यापासून सरकारने ज्या 267 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.भारत सरकारने सर्वप्रथम जून महिन्यात टिकटॉक सह 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती.सप्टेंबर महिन्यात चीनवर तिसरा डिजिटल स्ट्राईक करत भारताने एकाच झटक्यात 118 चिनी अ‍ॅप्सला बंदी घातली होती.

नवी दिल्ली - भारत सरकारने आता 59 चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यात शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप टिकटॉक, विचॅट, अलीबाबा तसेच यूसी ब्राउझर आणि बीगो लाइव्ह सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात ब्लॉक केल्यानंतर सरकारने संबंधित कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कंपन्यांच्या स्पष्टिकरणावर सरकार समाधानी नसल्याचे समजते. यामुळेच आता सरकारने या अ‍ॅप्सवर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

जूनपासून आतापर्यंत तब्बल 267 अ‍ॅप्सवर बंदी -गेल्या जून महिन्यापासून सरकारने ज्या 267 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. त्यांत या कायमची बंदी घातलेल्या 59 अ‍ॅप्सचादेखील समावेश आहे. भारत सरकारने सर्वप्रथम जून महिन्यात टिकटॉक सह 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. यानंतर जुलै महिन्यात पुन्हा एकदा 47 अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. तर सप्टेंबर महिन्यात चीनवर तिसरा डिजिटल स्ट्राईक करत भारताने एकाच झटक्यात 118 चिनी अ‍ॅप्सला बंदी घातली होती.

आयटी अ‍ॅक्टच्या कलम 69ए नुसार कारवाई -मोदी सरकारने मुख्यतः आयटी अ‍ॅक्टच्या कलम 69ए अंतर्गत चिनी अ‍ॅप्सविरोधात कारवाई सुरू केली होती. या अ‍ॅप्सवर, भारताचे सार्वभौमत्व, भारताचे अखंडत्व, भारताची सुरक्षितता, राज्य आणि सार्वजनिक व्यवस्थांच्या सुरक्षेसाठी प्रतिकूल कारवायांत सामील असल्याचा आरोप केला होता.

...म्हणून घातली कायमची बंदी -या 59 अ‍ॅप्सवर कायमची बंदी घालण्यापूर्वी सरकारने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यात नोटीशीत संबंधित अ‍ॅप्सना डेटा कलेक्शन, डेटा प्रोसेसिंग, डेटा सिक्यॉरिटी आणि प्रायव्हसीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयातील (IT) अधिकाऱ्यांचे या कंपन्यांनी दिलेल्या उत्तरांवर समाधान झाले नाही. यानंतर या अ‍ॅप्सवर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :chinaचीनTik Tok Appटिक-टॉकNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार