शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

"पाकिस्तान, चीनविरुद्ध कधी युद्ध पुकारायचं ते पंतप्रधान मोदींनी निश्चित केलंय"

By कुणाल गवाणकर | Updated: October 26, 2020 09:15 IST

पूर्व लडाखमधील तणाव वाढला असताना भाजप प्रदेशाध्यक्षांचं विधान

बलिया: पाकिस्तान आणि चीनविरुद्ध कधी युद्ध पुकारायचं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवलं आहे, असं विधान भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी केलं आहे. स्वतंत्र देव सिंह यांनी शुक्रवारी हे विधान केलं. भारत आणि चीनमधील तणाव सध्या वाढला आहे. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा वाढवला आहे. त्या पार्श्वभूमीवर सिंह यांनी केलेल्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.स्वतंत्र देव सिंह यांनी युद्धाबद्दलचं विधान करताना राम मंदिर आणि जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या घटनांचा संदर्भ दिला. 'राम मंदिर आणि कलम ३७० च्या निर्णयाप्रमाणेच पाकिस्तान आणि चीनसोबत युद्ध कधी करायचं हे मोदींनी ठरवलं आहे,' असं स्वतंत्र देव सिंह म्हणाले. त्यांच्या या विधानाची ऑडियो क्लिप सध्या व्हायरल झाली आहे.सिंह यांनी २३ ऑक्टोबरला बलियामधील सिकंदरपूरचे भाजप आमदार संजय यादव यांच्या निवासस्थानी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केलं. संजय यादव यांनी रविवारी सिंह यांच्या विधानाची ऑडियो क्लिप जारी केली. स्वतंत्रदेव सिंह यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांची तुलना दहशतवाद्यांशी केली. याबद्दल भाजपचे स्थानिक खासदार रविंद्र कुशवाहा यांना विचारणा केली असता, कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी प्रदेश अध्यक्षांनी ते विधान केल्याचं उत्तर त्यांनी दिलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीindia china faceoffभारत-चीन तणावPakistanपाकिस्तानBJPभाजपा