शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

10 वर्षांच्या मुलीवर 4 दिवस केला नराधमांनी सामूहिक बलात्कार

By admin | Updated: February 14, 2017 13:51 IST

गुडगाव येथे एका 10 वर्षांच्या मुलीवर सतत चार दिवस सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - गुडगाव येथे एका 10 वर्षांच्या मुलीवर सतत चार दिवस सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.  सुशांत लोक परिसरातील पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही नराधमांनी मुलीला सेक्टर 43 मधील एका झोपडपट्टीत तोंड आणि हातपाय बांधून ठेवले. चार दिवस तिच्यावर वारंवार बलात्कार केला. मात्र मुलीच्या तोंडून फेस येऊन ती बेशुद्ध झाली तेव्हा आरोपींची घाबरगुंडी उडाली.  
 
यावेळी तिघांनी गळा दाबून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, जेणेकरुन तिची ओळख पटणार नाही. यानंतर तिचा मृतदेह पाण्याच्या रिकाम्या टाकीमध्ये फेकला. असा किळसवाणा आणि माणुसकीचा काळीमा फासणारं कृत्य या तिघांनी केले. हत्या करण्यात आलेली मुलगी वजरीबाद गावात आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. मूळची पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेली या मुलीचे आई-वडील मजुरीचे काम करायचे. दरम्यान 16 जानेवारी रोजी मुलगी अचानक बेपत्ता झाली. जवळपासच्या परिसरात पोलिसांनी शोधाशोध केली मात्र तिचा काहीही पत्ता लागला नाही. 
 
यानंतर 23 जानेवारी रोजी क्रिकेट खेळणा-या काही मुलांना पाण्याच्या टाकीमध्ये मृतदेह आढळला. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली.तपासणीदरम्यान एका साक्षीदाराने पोलिसांना सांगितले की, तीन जण त्या मुलीला एका काळ्या रंगाच्या स्कोडा कारमध्ये घेऊन गेले.  शिवाय सुरक्षा रक्षकानेही स्कोडा कारला आसपासच्या परिसरात पाहिले होते. 
 
कार रेजिस्ट्रेशन क्रमांकाच्या आधारे पोलीस मालकापर्यंत पोहोचली आणि नंतर कारचालक एजाद मलिक (26)बाबतची माहिती समोर आली. एजाद हा मूळचा पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याची माहिती चौकशीदरम्यान समोर आली. 
डीसीपी दीपक साहरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिकला 11 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर कुकृत्यात सहभागी असलेले त्याचे साथीदार मुख्तार अली (30) आणि जलील (22) यांच्या नावाचाही खुलासा केला. त्याच्या खुलाशामुळे दोन्ही आरोपींच्या सोमवारी मुसक्या आवळण्यात आल्या. 
 
एजाद ड्रायव्हर, जलील ऑटो ड्रायव्हर आणि अली फेरीवाला होता. पोलिसांनी सांगितले की, अलीची मुलीसोबत ओळख होती, त्यानं 300 रुपये देण्याच्या बहाण्याने मुलीला कारमध्ये बोलावले. चिमुकलीवर अत्याचार करताना या तिन्ही नराधमांनी अमली पदार्थाचं सेवनही केले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली