दिल्ली/मुंबई : भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विदर्भातील ४० आमदारांनी भेट घेत त्यांना मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासाठी साकडे घातले असले तरी आमदारांच्या या भेटीकडे दिल्लीचे लक्ष लागून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या घडामोडीची माहिती घेतली. आमदारांच्या गडकरी भेटीमागे दिवाळीच्या शुभेच्छा व निवडणुकीत विजयी झाल्यानंतरचा आशीर्वाद या पलिकडे दुसरे कोणतेही कारण नसावे, असे मोदी व शहा यांना वाटत असल्याचे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचेच नाव मोदी व शहा यांनी निश्चित केले आहे. अशा भेटींमुळे कुठलाही निर्णय बदलणार नाही, असाही दावा पक्षाच्या सूत्रांनी केला आहे.
मोदींच्या मनात फडणवीसांचेच नाव
By admin | Updated: October 22, 2014 06:10 IST