शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

नाव गांधीबाग पण म. गांधींचेच अस्तित्व नाही (भाग २)

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

जो परिसर घाण आणि दुर्गंधीने भरला होता तेथे मनाला आल्हाद देणारे उद्यान तयार झाले. ज्या परिसरात नाक दाबून जावे लागत होते तेथे आता शांतता, स्वच्छता दिसायला लागली. गांधीजींना शांतता प्रिय होती. त्यामुळेच राष्ट्रसंतांनी या उद्यानाला गांधीबाग असे नाव दिले. तेव्हापासून या उद्यानाला आणि परिसरालाही गांधीबाग असेच नाव अद्यापपर्यंत आहे. पण येथे अजूनही म. गांधींचा पुतळा स्थापन करण्यात आला नाही. महापालिकेचेही या बाबीकडे दुर्लक्ष झाले. गांधीजींच्या नावाने असणाऱ्या उद्यानात गांधीजींनाच शोधण्याची वेळ येथे आली आहे.

जो परिसर घाण आणि दुर्गंधीने भरला होता तेथे मनाला आल्हाद देणारे उद्यान तयार झाले. ज्या परिसरात नाक दाबून जावे लागत होते तेथे आता शांतता, स्वच्छता दिसायला लागली. गांधीजींना शांतता प्रिय होती. त्यामुळेच राष्ट्रसंतांनी या उद्यानाला गांधीबाग असे नाव दिले. तेव्हापासून या उद्यानाला आणि परिसरालाही गांधीबाग असेच नाव अद्यापपर्यंत आहे. पण येथे अजूनही म. गांधींचा पुतळा स्थापन करण्यात आला नाही. महापालिकेचेही या बाबीकडे दुर्लक्ष झाले. गांधीजींच्या नावाने असणाऱ्या उद्यानात गांधीजींनाच शोधण्याची वेळ येथे आली आहे.
गांधीबाग हे नामकरण करण्यापूर्वी राष्ट्रसंतांच्या प्रेरणेने २९ जानेवारी १९५३ रोजी एका प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. आज गांधीजींची पुण्यतिथी आहे. पण गांधीबागेत मात्र म. गांधींचे अस्तित्व शोधूनही सापडत नाही. गांधीजींच्या पुण्यतिथीसाठी त्यावेळी प्रांतीय सरकार, सुधार प्रन्यास, सी. पी. अँड बेरार प्रॉपर्टीज कंपनी आणि सर्व धर्माच्या नागरिकांनी सहकार्य केले होते. टेलिफोन, पोस्ट ऑफिस, दिव्यांचे खांब, मॅजिस्ट्रेट निवास, कार्यकर्त्यांसाठी तंबू, राहुटी, उपयुक्त दुकाने, प्रदर्शन अशी व्यवस्था येथे सर्वांच्या सहकार्याने करण्यात आली. कार्यक्रमासाठी मान्यवरांचे संदेशही आले. यात सरदार वल्लभभाई पटेल, राजगोपालाचारी, कैलाशनाथ काटजू, काकासाहेब गाडगीळ, डॉ. पट्टाभिसीतारामय्या, स्वामी रामानंदतीर्थ, महावीर त्यागी, लोकनायक बापूजी अणे, जे. सी. कुमारप्पा, सेठ गोविंददास, राजकुमारी अमृत कौर आदींचा समावेश होता.
राष्ट्रसंतांचे गुरु योगीराज स्वामी, सीतारामदास महाराज, संत दामोदरदास महाराज हे दोन आठवड्यांपूर्वी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. वामनराव लोहकरे, रघुनाथराव पत्तरकिने यांनीही यावेळी हजेरी लावली. प्रभातफेरी ज्या मार्गावरून नेण्यात आली, त्या मार्गावर सडासंमार्जन करण्यात आले, रांगोळ्या काढण्यात आल्या. प्रभातफेरीत सायकलस्वार स्वयंसेवक सहभागी झाले. स्वागतद्वार उभारण्यात आले, देवदेवतांच्या प्रतिमा लावण्यात आल्या, भगवे फेटे घातलेली भजन मंडळे राष्ट्रीय भजने सादर करीत होती. मुख्य रथावर स्वामी सीतारामदास महाराज आरुढ झाले आणि मागे म. गांधी यांचे भव्य तैलचित्र लावण्यात आले. ३० जानेवारी रोजी गांधी स्मृतिदिनानिमित्त मार्गदर्शक भाषणे, सामुदायिक ध्यान, व्यायाम, योगासने आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन तीन दिवस करण्यात आले होते. राष्ट्रसंतांच्या प्रेरणेने आणि म. गांधी यांच्या विचारातून या परिसराचा कायापालट झाला. पण या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमा येथे उभारण्यात मात्र आमचाच नतद्रष्टपणा आड आला, असे म्हणावे लागेल.