नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट लागू असताना फुटीरवादी नेता मसरत आलम याच्या सुटकेचा निर्णय घेण्यात आला होता आणि रालोआ सरकारला ही सुटका रोखता येऊ शकली असती, असे सांगून काँग्रेसने बुधवारी लोकसभेत या मुद्यावरून सरकारला कोंडीत पकडले.शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार आलमची स्थानबद्धता ‘अस्तित्वहीन’ झालेली आहे व त्याला तुरुंगात कायम ठेवण्यासाठी नवा स्थानबद्धतेचा आदेश जारी करण्याची आवश्यकता आहे, असे जिल्हा आयुक्तांनी राज्याच्या गृहसचिवांना कळविले होते. आलमची सुटका करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस अधीक्षकाला दिले आणि तसे गृह खात्यालाही कळविले. त्यावेळी राज्यात राज्यपाल राजवट लागू होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
रालोआला आलमची सुटका रोखता येऊ शकली असती
By admin | Updated: March 12, 2015 00:05 IST