शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नीट वटहुकूमाबाबत राष्ट्रपतींनी मागितला खुलासा, नड्डा उद्या भेटणार

By admin | Updated: May 22, 2016 21:07 IST

नीट परीक्षा रद्द करण्याच्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्याआधी विचार का नाही केला, असा सवालही प्रणव मुखर्जींनी केला

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 22- वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) कक्षेतून राज्य परीक्षा मंडळांना बाहेर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने वटहुकूमाचा मार्ग अवलंबण्याच्या कारणांबाबत खुलासा करण्यासाठी आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा उद्या सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. विविध राज्यांनी दाखल केलेल्या याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देशभरात यावर्षापासूनच ‘नीट’ परीक्षा लागू करण्याचा आदेश दिला असताना केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या अडचणी विचारात घेत वटहुकूमाचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे न्यायालयीन आदेशावर कुरघोडी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी आरोग्य मंत्रालयाला त्यामागचे कारण विचारले असून वटहुकूमाबाबत राष्ट्रपती भवनातील तज्ज्ञांचे मतही मागवले असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले. मुखर्जी मंगळवारी चीनला जाणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी संबंधित वटहुकूमला मंजुरी दिली. सर्व सरकारी महाविद्यालये, अभिमत विद्यापीठ आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना नीटच्या कक्षेत आणण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला त्यामुळे आंशिकरीत्या बगल दिली जाणार असल्याचे मानले जाते.

शासकीय जागांसाठी सवलत....

राज्य सरकारच्या तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना सरकारकडून दिल्या जाणा-या जागाच नीटच्या कक्षेतून वगळण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून विविध खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना १२ ते १५ टक्के जागा दिल्या जातात. एका राज्यातून दुस-या राज्यात जाणा-या विद्यार्थ्यांना या कोटा पद्धतीचा लाभ मिळतो. १५ पेक्षा जास्त राज्यांनी नीटला विरोध केला होता. अलीकडेच झालेल्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत नीटच्या अभ्यासक्रमासाठी करावी लागणारी तयारी तसेच भाषेचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे येणा-या अडचणींकडे लक्ष वेधण्यात आले होते.