कानपूर : कोलकात्याहून दिल्लीला जाणारी एका ४० वर्षीय महिलेसोबत १५ वर्षीय मुलीवर टॉयलेटमध्ये बलात्काराचा प्रयत्न एका टोळक्याने केल्याने, घाबरलेल्या माय-लेकींनी धावत्या रेल्वेतून उडी मारली. त्यांच्यावर लाला लजपतराय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी तक्रार दाखल केल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. उडी मारल्यानंतर दोघी दोन तास बेशुद्ध होत्या. चांदरी स्टेशनवरील नागरिकांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. या महिलेचे पती खासगी कंपनीत काम करतात. त्यांना भेटण्यासाठी त्या दिल्लीला जात होत्या.टोळक्याने मुलीची विक्री करण्याचीही धमकी दिली. रात्री मुलगी टॉयलेटकडे जात असताना, चार ते पाच जणांनी तिच्यावर झडप घातली. मुलगी ओरडताच आई धावत आली आणि या लोकांपासून स्वत:ची सुटका करून घेत, माय-लेकींना रेल्वेतून उडी मारली.लाच देऊ न आरोपींची सुटका?हावडा स्टेशन सोडल्यानंतर या टोळक्याने मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. कॉन्स्टेबलने टोळक्यातील तिघांना पकडले. मात्र, अर्ध्या तासांत पोलिसांना लाच देऊन ते तिघे परत आले, असा आरोप महिलेने केला आहे.
रेल्वेतून माय-लेकींनी घेतली उडी, बलात्काराचा प्रयत्न; दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:01 IST