शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मायलेकीने मागितली इच्छामरणाची परवानगी, मस्क्युलर ड्रायस्ट्रोफीवर उपचारांसाठी पैसे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 04:43 IST

स्नायू कमकुवत होऊन त्यांची शक्ती कमी-कमी होत असल्याचा आजार (मस्क्युलर ड्रायस्ट्रोफी) असलेली महिला (५९) व तिच्या मुलीने (३३) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.

कानपूर : स्नायू कमकुवत होऊन त्यांची शक्ती कमी-कमी होत असल्याचा आजार (मस्क्युलर ड्रायस्ट्रोफी) असलेली महिला (५९) व तिच्या मुलीने (३३) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी शशी गंगा मिश्रा आणि त्यांची मुलगी अनामिका यांना झालेला हा आजार अनुवांशिक आहे. त्यांनी इच्छामरणाची परवानगी मागणारे पत्र राष्ट्रपतींना देण्यासाठी कानपूरचे शहर दंडाधिकारी राज नारायण पांडे यांना सुपुर्द केले आहे. पांडे यांनी हे पत्र राष्ट्रपतींच्या कार्यालयाला थेट पाठविल्याचे सांगितले. अनामिक मिश्रा यांनी पंतप्रधान मोदी आणि देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनाही पाठविलेल्या पत्रात एक तर आम्हाला आजारावर उपचारांसाठी आर्थिक मदत करा किंवा आमचे जीवन संपविण्याची परवानगी द्या, अशी विनंती केली आहे.माझे वडील गंगा मिश्रा यांनादेखील हाच आजार होता व त्यांचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर घरखर्चाची जबाबदारी उचलणारे कोणी उरले नाही. माझ्या आईला १९८५ मध्ये हाच आजार असल्याचे समजले, असे अनामिका यांनी सांगितले. सहा वर्षांपूर्वी अनामिका यांनाही हाच आजार जडला. या आजारात हाडांचे स्नायू कमकुवत होऊन त्यांच्यात बिघाड होतो. पांडे म्हणाले की, राज्य सरकारकडून या मायलेकींना आर्थिक साह्य दिले जाईल. मुख्यमंत्री निधीसाठी त्यांनी अर्ज सादर केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अनामिका मिश्रा म्हणाल्या की, यापूर्वी आर्थिक मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना रक्ताने पत्र लिहिले होते. त्यानंतर, आम्हाला ५० हजार रुपये मिळालेही होते. पण आम्हा दोघींना ती रक्कम काही दिवसच पुरली.>निकालानंतरचे पहिले प्रकरणसर्वोच्च न्यायालयाने ९ मार्च रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालाद्वारे बºया न होणाºया आजाराच्या रुग्णांना इच्छामृत्युपत्र करून इच्छामरणास संमती दिली आहे. मात्र, त्या मृत्युपत्रात आपल्यावर कोणतेही उपचार करू नये, असे नमूद करणे गरजेचे आहे, अशी अट घालण्यात आली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने निष्क्रिय इच्छामरण आणि इच्छामृत्युपत्र बनविण्यास परवानगी असल्याचे म्हटले होते.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद