शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘माय लॉर्ड’ होणार आता इतिहासजमा! ‘युवर आॅनर’चा वापर; केंद्र सरकारचे विजय दर्डा यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 03:50 IST

देशातील न्यायालयांत वर्षानुवर्षे वापरात असलेला ‘माय लॉर्ड’ आता हद्दपार होणार आहे. त्याऐवजी ‘युवर आॅनर’ हा शब्द वापरला जाईल. केंद्र सरकारनेच हा निर्णय घेतला आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : देशातील न्यायालयांत वर्षानुवर्षे वापरात असलेला ‘माय लॉर्ड’ आता हद्दपार होणार आहे. त्याऐवजी ‘युवर आॅनर’ हा शब्द वापरला जाईल. केंद्र सरकारनेच हा निर्णय घेतला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने विधि व न्याय राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे.राज्यमंत्री चौधरी यांनी विजय दर्डा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, याबाबत सर्व संबंधितांना निर्देश देण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाने दिल्या आहेत.विजय दर्डा यांनी २0 मे २0१७ रोजी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात, गुलामीची पार्श्वभूमी आणि स्वातंत्र्याची लढाई यांचा उल्लेख करीत, विमानांवरील ‘व्हीटी’ व न्यायालयांतील ‘माय लॉर्ड’ हे शब्द संपविण्याची विनंती केली होती. या पत्राची दखल घेत, पंतप्रधानांनी कार्यवाहीच्या आधारे त्याचे उत्तर देण्यास राज्यमंत्र्यांना सांगितले होते.तिरंग्याचा बॅच लावून संसदेत येण्याचा हक्क मिळविण्यासाठी आपणास झगडावे लागल्याचा उल्लेख विजय दर्डा यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केला होता.नियमात बदलराज्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या नियमातील कलम ४९ (१) नुसार ‘माय लॉर्ड’च्या ऐवजी ‘युवर आॅनर’ अथवा ‘आॅनरेबल कोर्ट’ अशी शब्दरचना केली जाऊ शकते.

टॅग्स :Courtन्यायालय