हैदराबाद : ‘तेलंगणात भाजपा सत्तेत आल्यास एमआयएम व ओवेसी बंधू यांना देश सोडून पळून जावे लागेल’, असे म्हणणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या टीकेला अकबरुद्दीन ओवेसी यांनी खणखणीत उत्तर दिले. योगींनी आधी आपला मतदारसंघ सांभाळावा. तिथे रुग्णालयात १०० हून अधिक मुले मेली, त्याकडे त्यांचे लक्ष नाही. पण इथे येऊ न ते धमकी देत आहेत. त्यांना घाबरत नाही. आपणच नव्हे, आपले वडील, आजोबाही इथेच जन्मलेत. त्यामुळे आपल्या वाडवडिलांचे हे राज्य आहे, असे त्यांना सुनावले.
माझ्या वडिलांचे राज्य - ओवेसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 04:54 IST