श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील पीडीपी-भाजपा युती सरकारकडून माझी हेरगिरी करण्यात येत आहे,असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केला असून यामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. दरम्यान पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीने अब्दुल्ला यांचा आरोप फेटाळून लावला आहे.उमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी टिष्ट्वटद्वारे राज्य सरकारवर हल्लाबोल केला. आपली मुलाखत घेण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय दैनिकाच्या महिला पत्रकारास सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी घराबाहेरच रोखले आणि तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तुम्ही कोण? उमर अब्दुल्ला यांना भेटण्याचे कारण काय? असे अनेक प्रश्न तिला विचारण्यात आले. यामुळे संतप्त अब्दुल्ला यांनी मुफ्ती सरकारला लक्ष्य केले. मुफ्ती साहेब, तुम्हाला अथवा तुमच्या सहकाऱ्यांना माझी माहिती हवी असल्यास थेट मलाच फोन करून विचारा. मी सर्व सांगेन. यासाठी माझ्या घराबाहेर आपली माणसे तैनात करण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला. दुसरीकडे सत्ताधारी पीडीपीने अब्दुल्ला यांचा आरोप फेटाळताना सदर महिला पत्रकाराची विचारपूस करणारा पोलीस नव्हे तर नॅशनल कॉन्फरन्सचा असंतुष्ट कार्यकर्ता होता असा दावा केला आहे.
काश्मिरातील सरकारकडून माझी हेरगिरी
By admin | Updated: September 4, 2015 22:39 IST