शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

देशात '60,000 किमीचा 'वर्ल्ड क्लास हायवे' बनविण्याचं माझं लक्ष्य, 2024 पर्यंत पूर्ण करणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 08:56 IST

नितीन गडकरी कुठल्याही नाविण्यपूर्ण उपक्रमसाठी नेहमीच कार्यशील असतात. रस्ते बांधणी कामात त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा देशातील दळणवळण यंत्रणा मजबूत करण्यास निश्चितच फायदा होत आहे.

ठळक मुद्देनितीन गडकरी कुठल्याही नाविण्यपूर्ण उपक्रमसाठी नेहमीच कार्यशील असतात. रस्ते बांधणी कामात त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा देशातील दळणवळण यंत्रणा मजबूत करण्यास निश्चितच फायदा होत आहे

नवी दिल्ली - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रस्ते विकास प्राधिकरणाच्या 16 व्या वार्षिक समारंभात सहभाग नोंदवला. यावेळी, बोलताना देशात 60 हजार किमी लांबीचा वर्ल्डक्लास नॅशनल हायवे बनविण्याचे माझे स्वप्न आहे. मला 2024 पर्यंत ते पूर्णही करायचे आहे. त्यासाठी, दिवसाला 40 किमीचा रोड बनिवण्यात येईल, असे गडकरींनी सांगितले.

नितीन गडकरी कुठल्याही नाविण्यपूर्ण उपक्रमसाठी नेहमीच कार्यशील असतात. रस्ते बांधणी कामात त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा देशातील दळणवळण यंत्रणा मजबूत करण्यास निश्चितच फायदा होत आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी देशातील विविध भागांत रस्ते रुंदीकरण आणि नव्याने रस्ते बांधणी कामासाठी लाखो कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अनेकठिकाणी या कामाच्या वर्क ऑर्डरही निघाल्या आहेत.  भारतात जवळपास 63 लाख किमीचे रस्ते दळणवळ आहे, जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा रस्ते महामार्ग आपल्या देशात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रस्ते दळणवळण हा अतिशय महत्त्वाचा भाग असून अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम या नेटवर्कमुळे शक्य होत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, सरकारकडून 1.4 ट्रिलीयन डॉलर (111 लाख कोटी रुपये) नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनसाठी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या क्षेत्रासाठी सरकारकडून दरवर्षी अर्थसंकल्पात जवळपास 34 टक्क्यांनी वाढ करण्यात येते. यंदाही 5.34 लाख कोटी रुपयांचा भरीव निधी वाढवून देण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकdelhiदिल्ली