तेलंगणा- हैदराबादेत एका न्यूज अँकरनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःच्या घरातील पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन तिने ही आत्महत्या केली आहे. आत्महत्येआधी तिने एक सुसाइड नोटही मागे ठेवली आहे. त्या सुसाइड नोटमध्ये तिने आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केला आहे.रविवारी रात्री 36 वर्षीय न्यूज अँकर राधिका रेड्डी हिने ती राहत असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली. पोलिसांना राधिकाच्या बॅगमध्ये एक सुसाइड नोटही मिळाली आहे. त्या सुसाइड नोटमध्ये तिनं लिहिलं आहे की, माझा मेंदूच माझा शत्रू आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या मते, ही टीव्ही अँकर मानसिक तणावाखाली होती.
'माझा मेंदूच माझा शत्रू'... न्यूज अँकरच्या सुसाइड नोटने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 12:30 IST