शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'मुस्लिम कोणाचंही ऐकणार नाहीत, ते जास्तीत जास्त मुलं जन्माला घालतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 09:08 IST

दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना सरकारी नोकरी नाही; भाजपा सरकारचा निर्णय

गुवाहाटी: दोनपेक्षा अधिक अपत्यं असणाऱ्यांना सरकारी नोकरी न देण्याचा निर्णय आसाम सरकारनं घेतला आहे. यावरुन ऑल इंडिया युनाइटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एआययूडीएफ) प्रमुख आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांनी आसाम सरकारला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे. इस्लाम केवळ दोन मुलं जन्माला घालण्यावर विश्वास ठेवत नाही. ज्यांना या जगात यायचंय, त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असं अजमल यांनी म्हटलं आहे. आसाम सरकारनं काही दिवसांपूर्वीच दोनपेक्षा अधिक अपत्यं असणाऱ्यांना सरकारी नोकरी न देण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाष्य करताना अजमल यांनी मुस्लिमांनी जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा, असं आवाहन केलं. 'आमच्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. तसंही सरकार आम्हाला नोकऱ्या देत नाही. आम्हाला सरकारकडून तशी अपेक्षादेखील नाही. त्यामुळे मुस्लिमांनी जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा. त्यांना चांगलं शिक्षण द्यावं. त्यामुळे ते प्रगती करतील आणि हिंदूंना नोकऱ्या देतील,' असं अजमल यांनी म्हटलं.शनिवारीदेखील अजमल यांनी अशाच प्रकारचं विधान केलं होतं. 'मुस्लिम समाज मुलं जन्माला घालत राहील. ते कोणाचंही ऐकणार नाहीत. या जगात जे येऊ इच्छितात, त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असं आमच्या धर्माला वाटतं,' असं अजमल यांनी म्हटलं होतं. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली 22 ऑक्टोबरला झालेल्या कॅबिनेट बैठकीत दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना सरकारी नोकरी ने दण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 1 जानेवारी 2021 नंतर ज्यांना दोनपेक्षा अधिक मुलं आहेत, त्यांचा सरकारी नोकरीसाठी विचार केला जाणार नाही. 

टॅग्स :Muslimमुस्लीम