शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरांच्या सुरक्षेसाठी मुस्लीम बांधवांचा पहारा!दंगलखोरांपासून गुरुकुल, गोशाळा वाचविण्यासाठी सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 08:19 IST

मंदिरांच्या सुरक्षेसाठी या भागातील ४१९ गावांमध्ये सर्व समाज समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या असून, त्या हिंसाचाराच्या दिवसापासून मंदिराबाहेर सतत पहारा देत आहेत.

बलवंत तक्षक -

चंडीगड : हरयाणातील नूह येथे हिंसाचार सुरू असतानाही मुस्लिम समाजाचे लोक सुरक्षेसाठी मंदिरांचा पहारा देत आहेत. नूह येथील बदकाली चौकात ३१ जुलै रोजी झालेल्या हिंसाचारानंतर एकाही मंदिराचे त्यांनी नुकसान होऊ दिलेले नाही. मंदिरांच्या सुरक्षेसाठी या भागातील ४१९ गावांमध्ये सर्व समाज समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या असून, त्या हिंसाचाराच्या दिवसापासून मंदिराबाहेर सतत पहारा देत आहेत.

नूहची गणना देशातील सर्वात मागास जिल्ह्यांमध्ये केली जाते. येथील ८० टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. नूह व्यतिरिक्त, फिरोजपूर झिरका, तावडू, पिंगवान, नगीना आणि पुनहाना या शहरांमध्ये २५ टक्क्यांहून अधिक हिंदू लोकसंख्या आहे. अनेक गावांमध्ये ९० टक्क्यांपर्यंत मुस्लिम लोकसंख्या आहे.

मरोडा गावचे सरपंच मुश्ताक खान म्हणतात की, ‘नूहमध्ये हिंसाचार झाला असला तरी मेवातमध्ये गंगा-जमुनी संस्कृती कायम आहे. ही संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी मुस्लिम लोक मंदिरांसमोर पहारा ठेवत आहे.  हिंसाचारानंतर लाठ्या-काठ्या, रॉड आणि शस्त्रे घेऊन आलेल्या शेकडो दंगलखोरांपासून गुरूकुल, गोशाळा वाचविण्याचे काम मुस्लिम समाजातील लोकांनी केले.’  खान म्हणाले की, दंगलखोरांना धर्म नसतो. समाजात द्वेष निर्माण करणे हे त्यांचे काम आहे. पण आपल्याला गंगा-जमुनी संस्कृती जपायची आहे आणि त्यासाठी आपण कधीही मागे हटणार नाही.’

चारही बाजुने वेढा, मुले घाबरली होती अन्...- भादस गावातील गुरूकुलचे आचार्य तरुण महाराज म्हणाले की, ‘सरपंच शौकत अली यांनी हिंसाचाराच्या काळात हिंदू-मुस्लिम बंधूभावाचा आदर्श ठेवला. गुरूकुलला चारही बाजूंनी वेढा घातला होता, मुले घाबरली होती. पण शौकत अली यांनी त्यांना सर्वतोपरी मदत केली. गोठ्यावर हल्ला करण्याचा डावही त्यांनी हाणून पाडला.- ’ गोशाळेचे संचालक वेदप्रकाश परमार्थी यांच्या म्हणण्यानुसार, मुस्लिम बांधव हे त्यांचे सुख-दु:खात सोबती आहेत. हरयाणा हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत २०२ जणांना अटक करण्यात आली आहे.

हिंसाचारावेळी रजा, एसपींची बदली- हरयाणातील नूह जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) वरुण सिंगला जिल्ह्यातील हिंसाचारावेळी रजेवर होते, त्यामुळे त्यांची बदली भिवानी येथे त्याच पदावर करण्यात आली आहे. 

आज काय घडले?- पानिपतमध्ये दुकानाची तोडफोड- मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त- गुरुग्राममध्ये तीन दुचाकी जाळल्या- अनेक परिसरात सलोखा-बंधुभाव

टॅग्स :HaryanaहरयाणाMuslimमुस्लीम