शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

नंदनवनमध्ये तरुणाची हत्या

By admin | Updated: July 20, 2015 23:59 IST

नागपूर : बहिणीच्या प्रेमविवाहामुळे संतप्त झालेल्या तरुणाने तिची मदत करणाऱ्या तरुणाची हत्या केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ७ च्या सुमारास ही घटना घडली. डिंकेश नारायणराव बारेवार (वय २३) असे मृताचे तर राहुल कामडे (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. दोघेही खरबीच्या साईनगरात राहतात.

नागपूर : बहिणीच्या प्रेमविवाहामुळे संतप्त झालेल्या तरुणाने तिची मदत करणाऱ्या तरुणाची हत्या केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ७ च्या सुमारास ही घटना घडली. डिंकेश नारायणराव बारेवार (वय २३) असे मृताचे तर राहुल कामडे (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. दोघेही खरबीच्या साईनगरात राहतात.
राहुलच्या बहिणीने दोन महिन्यापूर्वी एका तरुणाशी प्रेमविवाह केला. हा प्रेमविवाह करण्यासाठी तरुणी आणि तरुणाची डिंकेशने मदत केली. त्यामुळे राहुल डिंकेशवर चिडून होता. या कारणावरून तो डिंकेशसोबत वाद घालत होता तर, राहूलला डिंकेश याच नाजूक विषयावरून जास्त चिडवायचा. त्याला चारचौघात टोमणे मारायचा. सोमवारी रात्री ७ च्या सुमारास अशाच प्रकारे हे दोघे वस्तीत समोरासमोर आले. डिंकेशने राहुलची पुन्हा टर उडवणे सुरू केले. त्यामुळे संतप्त झालेल्या राहुलने डिंकेशच्या डोक्यावर लाकडी फळी मारली. गंभीर अवस्थेत डिंकेशला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डिंकेशचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच नंदनवन पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतले.

---